दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):-मानवतावादी आरोग्य क्षेत्रात कार्यरत असताना रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने गेल्या २३ वर्षांपासून पुणे ते पंढरपूर दरम्यान जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सलग सेवा सुरू आहे.
याही वर्षी दि.२२ जून पासून रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशराव कोते सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, प्रसिद्ध उद्योजक सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले रेड स्वस्तिक चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ बारणे, डॉ. उमाकांत वाबळे, डॉ. मनोज ठाकरे, नंदूभाऊ रायगडे ,कमलेश राक्षे, डॉ. संतोष सुपे डॉ . सांडभोर डॉ. सौ स्मिताताई वाबळे, डॉ .सौ. सुपे,सचिन भामरे, सौ.भामरे ताई , गुरुनाथ सोनवणे,आमले यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य सेवेला प्रारंभ झाला.
या वर्षी मानवतावादी आरोग्य सेवेच्या माध्यमातून ८३ हजार भाविकांना औषधोपचार पायांची मालिश यासह अनेक सेवा देण्यात आल्या. दि. १ जुलै रोजी जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम अकलूज येथे असताना रेड स्वस्तिक सोसायटीचे अखिल भारतीय अध्यक्ष तथा लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक सुरेशराव कोते, सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश बाळासाहेब पाटील, अभियंता सतीश सस्ते, रेड स्वस्तिक चे संचालक नंदू भाऊ रायगडे, गुरुनाथ सोनवणे यांनी अकलूज येथे भेट दिली.
त्यावेळी स्मृती भवनात झालेल्या कार्यक्रमांमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज ह.भ.प.प्रशांत महाराज मोरे देहूकर व इतर मान्यवरांनी रेड स्वस्तिक सोसायटीचा सन्मान केला.
त्यानंतर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेतृत्व विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी आम्हा सर्वांना आमंत्रित करून रेड स्वस्तिकच्या मानवतावादी आरोग्य उपक्रमाचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी विशेष कौतुक केले. यांचे सह महाराष्ट्राचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे,रेड स्वस्तिक चे सदस्य दौंड चे आमदार राहुल कुल यांनी रेड स्वस्तिक सोसायटीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
या आरोग्यवारीच्या उपक्रमासाठी मा. पोलीस महासंचालक व रेड स्वस्तिक चे संस्थापक डॉ. टी एस.भाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब जे. एस.शिंदे ,सुरेशराव कोते,गांधी,अशोक शिंदे,संतोष भाऊ बारणे,कमलेश राक्षे यांचे विशेष योगदान असते.
पंढरीच्या विठोबाची आस लागलेल्या वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेपासून मालिश पर्यंत संपूर्ण सेवा देणाऱ्या रेड स्वस्तिकच्या टीमचे नेतृत्व रेड स्वस्तिक चे प्रकल्प संचालक इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे सुपुत्र संतोष राजगुरू, जयसिंगराव पवार साहेब, डॉ. दत्ता खुणे, ह.भ.प. श्रीकांत महाराज यांचे नेतृत्वाखाली वसंतराव गायकवाड,नंदकुमार गावडे,विजय पायमल्ले,राजेंद्र बेडगे,अप्पा अतकरे,भगवान मोटरकर ,माऊली जाधव यांचे सह अनेक मान्यवर प्रत्यक्ष सहभाग घेऊन सेवा देत आहेत.
या सर्व सेवा देणाऱ्या मान्यवरां बाबत रेड स्वस्तिक सोसायटी ला प्रचंड अभिमान आहे. कारण वारकऱ्यांना सेवा देऊन मानवतेची पूजा करणारा प्रकल्प या सेवाभावी मान्यवरांमुळे यशस्वी होत आहे.
अशोक एस.शिंदे राज्य सचिव तथा राष्ट्रीय सह महाव्यवस्थापक रेडस्वस्तिक सोसायटी,,प्रोजेक्ट डायरेक्टर वारी नेतृत्व संतोष राजगुरू,पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योगपती, संतोष बारणे, कार्याध्यक्ष डॉ, उमाकांत वाबळे, मा, सेक्रेटरी जयसिंगराव पवार, रिटायर, डेप्युटी डायरेक्टर, डॉ, दत्ता खुणे, हभप, श्रीकांत, महाराज माकी, नंदकुमार गावडे, वसंत गायकवाड विजय पायमले, राजेंद्र बेडगे अप्पा आतकरे माउली जाधव भागवत मोटरकर वारी मध्ये सेवा बजावत होती पुणेते पंढरपूर, यावेळी, देहू संस्थानचे अध्यक्ष जालींदर नाथ मोरे मा, अध्यक्ष, पुरुषोतम महाराज मोरे, योनी प्रोजेक्ट डायरेक्टर संतोष राजगुरू यांचा सत्कार देहू संस्थानच्या वतीने वारीतील सेवे साठी अध्यक्षांनी केला, विश्वस्त नितिन महाराज मोरे, ह.भ.प.तुकाराम महाराज मोरे वंशज, प्रशांत मोरे सह संस्थानचे विश्वस्त यांनी वारी कॅम वरती येऊन विचारपुस केली व शुभेच्छा दिल्या.
