दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी रिसोड वाशिम -भागवत घुगे
पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक साहित्यांपैकी पळसाच्या पानाचे पान घोंगडं यांनाही तितकेच महत्त्व आहे. याचा उपयोग प्रामुख्याने शेतकरी पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी वापर करतात. यात इरले घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. मात्र आता बदलत्या जीवनशैलीच्या परिणामामुळे ग्रामीण भागातून पळसाच्या पानाचे घोंगडं दुर्मिळ होत आहे.
सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळत असल्याने पान घोंगडं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात मोहजाबंदी मांडवा कापडसिंगी लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून पान घोंगडी बनविण्याचे काम करत. यातून आदिवासी बांधवांना पैसेही मिळत; परंतु जसा काळ बदलत गेला
आहे, तशा रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. शेतीमधून बैल, नांगर हद्दपार होऊन त्याची जागा ट्रॅक्टरने व टीलरने घेतली आहे. तसेच पान घोंगडी बनविण्याचा व्यवसायही बदलत्या काळानुसार संपुष्टात येत आहे. पूर्वी पावसाळा सुरू झाला की, शेतकरी पान घोंगडी बनविणाऱ्या करागिराला ऑर्डर देऊन पान घोंगडी बनवून घेत. पण आज या पान-
प्लास्टिकने घेतली पान-घोंगड्यांची जागा…
शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या पान-घोंगडीची जागा आता रेनकोट, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांनी घेतल्यामुळे पान-घोंगडी बनविण्याच्या पारंपरिक करागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात रेनकोट, मेनकापड, प्लॅस्टिक उपलब्ध होते. पान घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळत नसल्यामुळेही आदिवासी समाजातील कामगारांना मजुरी करून अन्य काम करून पोट भरावे लागत आहे.
घोंगडीचा विसर खुद्द शेतकऱ्यांनाच पडला आहे. रेनकोट, गमबूट, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे; परंतु पान-घोंगडी बनविणाऱ्याकडे कुणीही फिरकत नाही. ५०० ते १००० रुपयांत मिळणाऱ्या प्लॅस्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी पान-घोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करत नाही, शरीराला ऊब देणारा नाही; हेच पान घोंगडं अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे. पान-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या पान-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
