दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे-
( पुणे ) वाघोली : इंडस्ट्रीयल क्षेत्रातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ओरिएंटल रबर इंड. प्रायव्हेट लिमि चे सर्वेसर्वा मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम विजयानंद माकर यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने ( ता.०६ ) रोजी निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या पाठीमागे पत्नी श्रीमती पूनम विक्रम माकर, मुलगी अवंतिका विक्रम माकर,भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण ओरिएंटल रबरच्या कामगार वर्गावर शोककळा पसरली आहे.आमचे एक कुटुंबप्रमुख जे आम्हाला सुख दुःखात कायम खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहात समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम विक्रम माकर सरांनी केले अशा भावना या वेळी ओरिएंटल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मायंबा ढेरंगे यांनी प्रकट केल्या.
समाजातील सर्व क्षेत्रात विक्रम माकर यांचा वावर होता. त्यांनी जीव लावून माणसे तयार केली होती. आपल्या कामगारांविषयी त्यांना प्रचंड अभिमान होता.एका कुटुंबाप्रमाणे त्यांनी कामगारांना सांभाळण्याचे काम केले.त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली.
– संदीप ढेरंगे, विद्यमान सरपंच, कोरेगाव भिमा, शिरूर, पुणे.
