रविवारी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी असल्याचं म्हंटल आहे.
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या,’प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! असा खोचक टोमणा मारत सुषमा आधारेंनी भाजपला टार्गेट केलं आहे.
आपल्या संघटनेच्या नावामध्ये प्रवीण गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला असल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान, प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट दौऱ्यावर होते.प्रवीण गायकवाड यांनी आज अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. मात्र, या सत्कार समारंभाच्या ठिकाणीच त्यांना काळं फासण्यात आल्याने मोठा राडा पाहायला मिळाला. तर दुसरीकडे, इंदापूरच्या शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली आहे. पोलसांनी सदर व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषणदेखील केले होते.
रविवारी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांना काळं फासण्यात आले आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मात्र या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी असल्याचं म्हंटल आहे.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सोशल पोस्ट :
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या,’प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय..! असा खोचक टोमणा मारत सुषमा आधारेंनी भाजपला टार्गेट केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?