
महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना !
अकोला : अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे ठिय्या आंदोलन सुरुये. गेल्या 2 तासापासून आमदार देशमुख यांचं ठिय्या आंदोलन सुरुये.
मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहे. दरम्यान, या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे.
विधानसभा अध्यक्ष मॅनेज झालेत : आमदार नितीन देशमुख
दरम्यान, या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे, कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचं स्पष्टपणे देशमुख म्हणालेय. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं ते म्हणालेय.
मुर्तीजापुर मतदारसंघाच्या आमदाराचे पाठबळ, पिडीत महिलेचा आरोप
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केलाय. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केलाय.
विधानपरिषदेत आज मध्ये महत्वाचे काय?
1) पंडिता रमाबाई मुक्ती मिशन तालुका दौंड या संस्थेमध्ये गरीब असह्य मुली महिला यांच्या करिता सेवेच्या नावाखाली ख्रिच्छन धर्मामध्ये धर्मांतर केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे
2) राज्यातील गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस, विक्रीस, वाहतुकीस बंदी असून देखील अनधिकृत पणे वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस अली आहे. नुकतीच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 56 हजार किलो गोमांस घेऊन जाणारे दोन कंटेनर जप्त करण्यात आले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दररोज 20 ते 25 टन गोमांस विक्री तेलंगणा येथे होत असल्याची बाब समोर आली आहे. सातत्याने उघडकीस येणाऱ्या या घटना पाहता अशा गुन्हे करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कडक कायदा हिवाळी अधिवेशनात करावा अशी मागणी आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे.
3) मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे.पुरुषांसाठी असलेल्या एका सामुदायिक शौचालयाचा वापर 86 पुरुष करत आहे तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालय हे 81 महिला वापरत आहेत. मुंबईतील ह्या सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.
4) राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला मागील तीन महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याकडे नियम 93 अन्वये आमदार अरुण लाड लक्ष वेधतील
5) मुंबईतील कबुतर खाणे बंद केल्यानंतर कबुतर निवासी इमारतीमध्ये आश्रय घेण्याची शक्यता असल्याने त्यांना विजनवासात सोडण्याबाबत ठोस उपाययोजना हाती घेण्यात बाबत नियम 93 अन्वये आमदार सुनील शिंदे निवेदन करतील.