
नेमकं काय बोलणं झालं ?
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बुधवारी (दि. १६ जुलै) तेरावा दिवस आहे. दरम्यान, आज विधीमंडळात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली.
उद्धव ठाकरे अंबादास दानवे यांच्या केबिनमधून विधान परिषदेत जात होते. तेव्हा त्यांना पहिल्यांदा अमोल मिटकरी भेटले. यावेळी मिटकरी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले. त्यानंतर डाव्या बाजूकडून मुख्यमंत्री फडणवीस आले. यावेळी ठाकरे आणि फडणवीसांची समोरासमोर भेट झाली. दोघांनीही नमस्कार…. असे म्हटले. त्यानंतर फडणवीस विधान परिषदेत निघून गेले.
राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकवेळा आरोप प्रत्यारोपांचा सामना झाला आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. गडचिरोलीला ‘नक्षलवाद्यांचा जिल्हा’ याऐवजी गडचिरोलीला ‘पोलाद सिटी’ म्हणून नवीन ओळख मिळून देण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाचेदेखील याआधी ठाकरेंच्या शिवसेनेने कौतुक केले होते.