
भारत आणि रशिया एक महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. पाकिस्तानसाठी ही वाईट बातमी आहे. कारण यामध्ये पाकिस्तानच नुकसान आहे. दोन महिन्यांपूर्वी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानला ब्राह्मोस मिसाइलची ताकद दाखवून दिली होती.
पाकिस्तानला अक्षरक्ष: भारताने गुडघ्यावर आणलं होतं. आता भारत आणि रशिया ताकतवर सुपरसोनिक क्रूज मिसाइलला हायपरसोनिक बनवण्यासाठी एकत्र आले आहेत. भारत आणि रशियाचे एक्सपर्ट मिळून यावर काम करत आहेत. ब्राह्मोसलाच हायपरसोनिक बनवण्यासाठी दोन्ही देश एकत्र आलेत. अलीकडेच भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या या शस्त्राची जगाने ताकद पाहिली होती. 15 देश ब्राह्मोस मिसाइल विकत घेण्यामध्ये रुची दाखवत आहेत. ब्राह्मोसच हायपरसोनिक वर्जन आल्यानंतर ही ताकद अजून कित्येक पटीने वाढेल.
ब्रह्मोस एअरोस्पेसचे माजी महासंचालक अतुल राणेंनी या बद्दल खुलासा केलाय. RT ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, रशिया आणि भारत मिळून लवकरच ब्राह्मोसच्या क्रूज मिसाइलच हायपरसोनिक वर्जन बनवू शकतात मॉस्कोत झालेल्या या चर्चेबद्दल राणे म्हणाले की, सध्या ब्रह्मोसचे अनेक वर्जन आहेत. दोन्ही देश यामध्ये सुधारणा करत आहेत.
कुणाचा किती टक्के वाटा?
ब्रह्मोस क्रूज मिसाइल भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम आहे. या मिसाइलच नाव ब्रह्मपुत्र आणि मोस्कवा नदीच्या नावावरुन देण्यात आलं आहे. डीआरडीओची यामध्ये 50.5 टक्के भागीदारी आहे. रशियन एनपीओ मशीनोस्ट्रोयेनियाचा 49.5 टक्के हिस्सा आहे. राणे यांच्यानुसार, “भारत आणि रशिया दोन्ही देश सतत या मिसाइलच्या टेक्नोलॉजीवर काम करत आहेत”
शत्रुला प्रतिक्रिया देण्यासाठी फार वेळ मिळत नाही
जे मिसाइलचा वेग आवाजाच्या गतीपेक्षा कमीत कमी पाचपट जास्त असेल तो मिसाइल हायपरसोनिक असते. त्याचा कमीत कमी स्पीड 6174 किमी प्रतीतास असतो. खूप कमी वेळात हे मिसाइल आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचतं. उड्डाणादरम्यान हे मिसाइल आपली दिशा सुद्धा बदलू शकतं. प्रचंड वेग असल्यामुळे या मिसाइलला अँटी मिसाइल सिस्टिम आणि रडार इंटरसेप्ट करु शकत नाही. शत्रुला प्रतिक्रिया देण्यासाठी सुद्धा फार कमी वेळ मिळतो. हायपरसोनिक मिसाइल अणवस्त्र वाहून नेण्यास सक्षम असतं.
किती देशांनी इंटरेस्ट दाखवलाय ?
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यानुसार आतापर्यंत 15 देशांनी ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवला आहे. भारत आणि रशिया दोन्ही देशांना ज्या देशांवर आक्षेप नाहीय, त्या देशानाच हे मिसाइल देता येईल. ब्राह्मोसचा वेग, ताकद सगळ्या जगाने पाहिली आहे.