
लोकसभेचे उमेदवार निवडून आले, तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले. अल्लाहू अकबर, सर तन से जुदा हे नारे उमेदवाराच्या विजयी मिरवणुकीत कसे दिले? हिरवे झेंडे कसे फडवकले? खरा विलन कोण हे तरी ओळखा.
मराठी सक्ती आमच्या राज्यात आहे. आम्ही मराठी नाही का? आम्ही पाकिस्तातून आलोय का?” असा प्रश्न मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी विचारला. राज ठाकरे यांच्या काल मीरारोडमध्ये झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
“जो खरा विलन आहे, तुम्ही हातवर करुन सभा घेताय. त्याला आपण प्रश्न विचारत नाही, तू कशी अशी घाण केलीस? आजच्या सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे का? सध्या बंधु प्रेम आलय माझा भाऊ, माझा भाऊ चालू आहे ना. आज सामनामध्ये का बातमी नाही, राज ठाकरेंच्या सभेची?. खरा शकुनी मामा कोण ते समजून घ्या. तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीसाठी त्याला जबाबदार धरा. हिंदी सक्तीच्या नावाने उर्दू सक्तीचा मार्ग मोकळा करत होता उद्धव ठाकरे, हे लक्षात घ्या” अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली.
‘जे खुलेआम धमक्या देतात, त्यांना मराठी शिकवा’
राज ठाकरे यांनी निशिकांत दुबेवर टीका केली. त्यावर नितेश राणे म्हणाले की, “आशिष शेलार हाऊसमध्ये बोलले कोणी निशिकांत दुबेच समर्थन करत नाही. पण मीरा रोडची सभा नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चुकून पण कोणी मराठी बोलत नाही. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानत नाही करोना काळात आपण मास्क लावायचो, वॅक्सीन घ्यायचो. पण नया नगरमध्ये शरिया कायदा लागू होता. नया नगरमध्ये डायरेक्ट धमकी देतात, मराठी नाही बोलणार. गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा जे खुलेआम धमक्या देत आहेत, त्यांना मराठी शिकवा असं नितेश राणे म्हणाले.