
दैनिक चालु वार्ता म्हसळा -( रायगड ) प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – अभ्यास असा करा आणि भरघोस यश मिळवा याची खात्री करून देताना विद्यार्थ्यांनी तणाव मुक्त राहुन शरीरशास्त्रा नुसार अभ्यासाचे आकलन करावे म्हणजे
हमखास यश संपादन कराल असे मौलिक मार्गदर्शन मनशक्ती प्रयोग केंद्राच्या साधक श्रीमती क्रांती हुक्केकरी यांनी जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा वरवठणे आगरवाडा मराठी माध्यमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात केले.मार्गदर्शन शिबिरात जिजामाता व मेंदडी शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी मोफत लाभ घेतला.शिबिराला संस्था प्रमुख माजी सभापती महादेव पाटील, साधक अमोल मोरे,वनपाल शाहीर भीमराव सूर्यतळ,प्राथमिक शाळा पेडांब मुख्याध्यापक बालाजी राठोड,साळविंडे शाळा मुख्याध्यापक शशिकांत भिंगारदेवे, बनोटी शाळा मुख्याध्यापक जयसिंग बेटकर,अनिल बेडके , मेंदडी शाळा मुख्याध्यापक मेघशाम लोणशिकर,तेजस कांबळे, मुख्याध्यापक संदिप कांबळेकर,अंगद कांबळे,अंकुश गाणेकर,लक्ष्मण गाणेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली मनशक्ती प्रयोग केंद्र ही एक विज्ञाननिष्ठ सामाजिक कार्य करणारी संस्था गेली ५० वर्षे लोणावळा येथे कार्यरत आहे. संस्थेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत विविध अभ्यास वर्ग,शिबिर,इलेक्ट्रॉनिक यंत्र चाचण्या असे अनेक उपक्रम घेतले जातात त्या अनुषंगाने साधक अमोल मोरे यांच्या माध्यमातून म्हसळा येथे आयोजित मनशक्ती अभ्यास वर्गात साधक क्रांती हुक्केकरी यांनी शरीरशास्त्रा नुसार मुलांनी अभ्यासाचे आकलन कसे करावे,अभ्यासाच्या सोप्या पद्धती, परीक्षा काळातील स्थैर्य,स्मरणशक्ती वाढ, व्यक्तमत्व विकास,गुणवत्ता वाढ,बोलण्या वागण्यात योग्य बदल,तणाव मुक्त आणि विश्वकल्याण प्रार्थना आदी यश निश्चिती बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.शाळेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि मनोमन धन्यवाद दिले.