
दैनिक चालु वार्ता म्हसळा -(रायगड) प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा – कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या नर्सिंग सहाय्यक प्रशिक्षण लाभार्थीसाठी “इफको- टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड” यांच्या तर्फे नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती व कौशल्यवृध्दी क्षमता बांधणी कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १८ जुलै २०२५ रोजी बोर्ली पंचतन, श्रीवर्धन येथे संपन्न झाले.जन शिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ. रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉ. विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व ”कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार” यांच्या विशेष पुढाकारातून “प्रथमोपचार पद्धती आणि पूर्वतयारी नर्सिंग प्रशिक्षण” कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसाराकरिता महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर्स व आरोग्यसेवा तज्ञ इत्यादींचे मार्गदर्शन सातत्याने लाभत आहे, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित “नर्सिंग सेवा प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती व कौशल्यवृध्दी क्षमता बांधणी” कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार दिनांक १८ जुलै २०२५ रोजी बोर्ली पंचतन, श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्य मार्गदर्शक अतिथी म्हणून डॉ. आकांक्षा तांबे, ॲड. विनयकुमार सोनवणे, श्री. रुपेश गमरे, सेवानिवृत्त गट शिक्षण अधिकारी सौ. शीतल तोडणकर, प्रा. कानिफ भोसले, प्रा. कल्पना देवगावकर यांच्या समवेत साधनव्यक्ती सौ. विप्राली पुसाळकर, सौ. रोहिणी सोनवणे, सहायक कार्यक्रम अधिकारी कु. भाग्यश्री पुसाळकर व रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवा प्रशिक्षणात कार्यरत स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये “आरोग्य सेविका- स्वच्छता, कर्तव्ये, जबाबदारी” या विषयावरती सौ. शीतल तोडणकर, “वैद्यकीय क्षेत्रातील जबाबदारी व महत्व” या विषयावरती डॉ. आकांक्षा तांबे, “वैद्यकीय क्षेत्रातील कायदेविषयक बाबी” या विषयावरती ॲड. विनयकुमार सोनवणे, “प्रथोमपचार पद्धती व जीवन कौशल्य” या विषयावरती श्री. रुपेश गमरे, “किशोरवयीन मुलींचे आरोग्य” या विषयावरती प्रा. कल्पना देवगावकर, “जे. एस. एस. व्यवसाय प्रशिक्षणाची गरज” या विषयावरती सौ. विप्राली पुसाळकर ह्यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.