
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली असून राज्याचे कृषी मंत्रीपद ना. मकरंद पाटील यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
शेतकर्यांविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोबाईलवर जंगली रमी खेळतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तर त्यांच्या अडचणींमध्ये आणखीनच भर पडली आहे. लातूर येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांच्यासमोरच ना. कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
या पार्श्वभूमीवर ना. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार असून राज्याचे कृषिमंत्रिपद ना. मकरंद पाटील यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू आहे. कृषिमंत्रिपद सातार्याला मिळाल्यास मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्याचे वजन आणखी वाढेल, अशा चर्चेलाही उधाण आले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र या घडामोडींना दुजोरा देण्यात आलेला नाही.