
काळजी पिळवटून टाकणारा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी दाखवला; राजकीय खूनच !
बीड जिल्ह्यातील केज तहसीलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले, असे राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे.
आव्हाड यांनी महिलेच्या मृत्यूनंतर तिचे कुटुंबीय तहसील कार्यालयासमोर आक्रोश करत असल्याचा काळजी पिळवटून टाकणारा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे.कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे. सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या.त्याविरोधात सदरील महिला उपोषण करत होती.मयत महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली.पण “आमच्या अखत्यारीत हे प्रकरण येत नाही”,अस पत्र तहसीलदाराने सदरील महिलेस दिले.अशी प्राथमिक माहिती आहे.
अखेर शेवटचा उपाय म्हणून ही महिला उपोषणाला बसली असताना तिचा जीव गेला. आत्महत्या करत आधी शेतकरी आपला जीव देतच होते…पण आता उपोषण करताना देखील त्याचे जीव जाताहेत.कृषिप्रधान देशाला ही काळिमा फासणारी घटना आहे. असे देखील आव्हाड यांनी म्हटले आहे.
महिलांचा आक्रोश पहा…
महिलेच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील ट्विट करत, फडणवीससाहेब, महिलांचा आक्रोश पहा..बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी आणि महिला आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. यातील एका उपोषकर्त्या महिलेचा मृत्यू झालाय. महायुती सरकारला लाज वाटली पाहिजे. आपल्या न्यायासाठी झगडणाऱ्या महिलेचा बळी या शासन-प्रशासनाने घेतला आहे, असे म्हटले आहे.
मृत्यू घरीच झाला ?
मिळालेल्या माहितीनुसार, आवादा कंपनीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भोसले कुटुंबातील सुबाबई गोपाळ भोसले (वय 70) यांचा मृत्यू घरी झाला होता. त्यांचे पुत्र मुलगा संतराम भोसले हे उपोषणाला बसले होते. दरम्यान, सुबाबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उपोषणस्थळी आणण्यात आणण्यात आला. तसेच पाच तास तहसील कार्यालयासमोर ठेवण्यात आला त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.