
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी भोर -अनिस आतार
भोर, ता. 29: भोर – कापूरव्होळ-
पुणे मार्गावरील नेकलेस पॉईटजवळ माळवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत भोर आगाराची एसटी रस्त्याच्या गटाराच्या खड्ड्यात जाऊन खचली. सोमवारी (ता. २८) पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, भोरच्या एसटीच्या बसच्या अपघाताची मालिका सुरुच असल्याचे दिसत आहे.
भोर आगाराची सोलापूर- पुणे- भोर एसटी (क्र एमएच १४ एमए २६४९)
सोलापूरवरून रविवारी (ता. २७) सायंकाळी साडेपाच वाजता निघाली होती. वाहतूक कोंडीमुळे एसटीला उशीर झाला. ही बस पुण्याहून सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास भोरला निघाली असता वळणावर एसटी गटाराच्या खड्ड्यात उलटली. एसटीतील एका महिलेला किरकोळ दुखापत झाली. एसटी चालक वैशव शेटे व वाहक प्रकाश गुरव यांनाही किरकोळ मार लागला. दरम्यान, या महिन्यात एसटी रस्त्याच्या कडेला पडण्याच्या आणि खचण्याच्या पाच-सहा घटना घडल्या आहेत.