
दैनिक चालु वार्ता ठाणे-प्रतिनिधी-नागेश पवार
दिवा- १० वी च्या २००० विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी अॅप्स’ मोफत वितरित करण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेने केला आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री गणेश विद्यामंदिर, दिवा पूर्व येथून करण्यात आली.
१ ऑगस्ट रोजी आयडियल स्टडी अॅप्स ३४४ SSC विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले, जे त्यांच्या अभ्यासासाठी डिजिटल मदतीचा एक प्रभावी टप्पा ठरेल.
या उपक्रमास क्लब टायटन अध्यक्ष किशोर पाटील व क्लब सचिव स्वप्नील गायकर, खजिनदार विकास गुंजाळ, नवनीत पाटील माजी अध्यक्ष अभिषेक ठाकूर आणि साईनाथ म्हात्रे, माजी सचिव अंक मुंडे आणि प्रकल्प प्रमुख प्रतीक बेडेकर यांची उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याच्या या वाटचालीस रोटरी क्लबसोबत एकत्र पाऊल टाकूण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.