
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत आहेत. टॅरिफचा वाद असो अथवा दोन देशांतील यु्द्ध थांबवणं असो प्रत्येक वेळी ट्रम्प क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात.
आताही त्यांनी एक खास योजनेचा उल्लेख केला आहे ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ताज्या रिपोर्टनुसार ट्रम्प सरकारने भारतासह अन्य देशांवर टॅरिफ आकारण्याची घोषणा केली आहे. या टॅरिफमधून मिळणारे पैसे अमिरेकी नागरिकांना लाभांशाच्या रुपात वाटण्याचा विचार केला जात आहे.
रॉयटर्स न्यूज एजन्सीनुसार ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आकारण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. हा टॅरिफ 1 ऑगस्टपासूनच आकारण्यात येणार होता. परंतु, सात दिवसांची आणखी वाढ देण्यात आली. यानंतर भारताकडूनही 25 टक्के टॅरिफ ट्रम्प सरकार वसूल करण्याची शक्यता आहे. भारताकडून टॅक्सच्या रुपात वसूल केलेला हा पैसा अमिरेकी नागरिकांना दिला जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेची आणखी माहिती सध्या तरी दिलेली नाही.
कोणत्या देशावर किती टॅक्स
ट्रम्प सरकारच्या नव्या टॅरिफच्या यादीत भारता व्यतिरिक्त युरोपीय संघ आणि ब्रिटेनवर 15 टक्के, जपान 10 टक्के, दक्षिण कोरिया 5 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्यात आला आहे. साधारण 7 ऑगस्टपासून हा कर वसूल केला जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त कॅनडावर 35 टक्के, ब्राझीलवर 50 टक्के, स्वित्झर्लंड 39 टक्के, तैवानवर 20 टक्के टॅक्स आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.