
विशेष तपास पथक करणार चौकशी…
एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर याला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर अनेक आरोप झाली. आता रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाने देखील उडी घेतल्याने रोहिणी खडसे चांगल्याच संतापल्या.
आता थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केली आहेत. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडलं, याचा पाढाचा त्यांनी वाचून दाखवलाय. यानंतर आता चांगलीच खळबळ उडालीये.
पुणे खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात महिला आयोगाने अहवाल मागवला होता आणि तो आता त्यांना देण्यात आलाय. धक्कादायक बाब म्हणजे नाथाभाऊंच्या जावयाच्या मोबाईलमध्ये घरातील साफसफाई करणाऱ्या महिलेचे धक्कादायक व्हिडीओ सापडली आहेत. तसा अहवाल पोलिसांकडूनच देण्यात आलाय. फक्त घरातील महिला कामगारच नाही तर अनेक मुलींची फोटो देखील सापडली आहेत.
पुणे पोलिसांनी ज्या रेव्ह पार्टीवर छापेमारी केली, त्या देखील पार्टीतून काही मुलींना ताब्यात घेण्यात आले. घरातील साफसफाई करणाऱ्या महिलेचे काही धक्कादायक व्हिडीओ प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये सापडल्याने खळबळ उडाली असून त्या दोघांचा संबंध नेमका काय? याचा तपास हा केला जाणार आहे. यासोबतच महिलांवरील काही अत्याचाराचे व्हिडीओही मोबाईलमध्ये मिळाली आहेत. प्रांजल खेवलकरच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडिओ सापडली आहेत तर 1497 फोटो देखील मिळाली आहेत. परप्रांतीय मुलींना पार्टीत बोलावले जात असल्याचाही खुलासा झालाय.
यापैकी काही फोटो मुलींचे असून ते अश्लील आहेत. या व्हिडीओमधून हे स्पष्ट होतंय की, मुलींना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे दिसत असल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. या व्हिडिओचा वापर मुलींना परत ब्लॅकमेल करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. रूपाली चाकणकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालयाचे बघायला मिळतंय. आता यावर रोहिणी खडसे या काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पतीच्या बचावासाठी रोहिणी खडसे या काही दिवसांपासून मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.