
अमेरिकेन खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा; टॅरिफबाबत दिला सल्ला !
भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफ वॉर सुरु
डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील टॅरिफ संदर्भात ग्रेगरी मीक्सचा सल्ला
भारत आणि अमेरिका संबंध न बिघडवण्याचा इशारा
वॉशिंग्टन : सध्या अमेरिका आणि भारतामध्ये तीव्र टॅरिफ वॉर सुरु आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लागू केला आहे. याच वेळी अमेरिकेच्या सिनेटर ग्रेगरी मीक्स यांनी ट्रम्पच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. डोनाल्ड ट्रम्पला फटकारत त्यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफसंबंधी सल्ला दिला आहे.
भारत आणि अमेरिका संबंधांना धोका- ग्रेगरी मीक्स
ग्रेगरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफची योजना हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. या टॅरिफमुळे अनेक दशकांपासून असलेल्या भारत आणि अमेरिकेच्या धोरणात्मक संबंधाना धोका निर्माण झाल्याचे ग्रेगरी यांनी म्हटले. ग्रेगरी मीक्स हे अमेरिकेच्या हाऊस फॉरेन अफेयर्स कमिटीचे डेमोक्रॅटिक सदस्य आहेत. त्यांनी सांगितले आहे की, भारत आणि अमेरिकेमध्ये संबंध दृढ करण्यासाठी कठोर परिश्रम करण्यात आले आहेत.
मात्र ट्रम्पच्या टॅरिफमुळे हे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांच्या केवळ धोरणात्मकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक संबंधावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ग्रेगरी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सर्व वाद लोकशाही मुल्यांनुसार सोडवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ट्रम्प यांना इशारा दिला आहे की, त्यांचे टॅरिफ धोरण भारत आणि अमेरिकेमधील मजबूत संबंध खराब करु शकतात.
भारत हा एक उत्तर धोरणात्मक भागीदार
याच वेळ एकीकडे डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ वॉरच्या मोडमध्ये आहेत, तर इतर अमेरिकन अधिकारी त्यांना भारताशी संबंध न बिघडवण्याचा सल्ला देत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारताचे एक उत्तर धोरणात्मक भागीदार म्हणून केले आहे. अधिकाऱ्याच्या मते दोन्ही देशांत स्पष्ट आणि प्रामाणिक चर्चा होते.
निक्की हेली यांनी देखील ट्रम्पला दिला सल्ला
याच वेळी रिपल्बिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी देखील ट्रम्प यांना सल्ला दिला आहे. त्यांनी देखील अमेरिकेने भारतासारख्या मजबूत देशासोबत असलेली भागीदारी खराब न करण्याचे म्हटले आहे. तसेच चीनसारख्या शत्रू देशाला सूट दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
FAQs (संबंधित प्रश्न)
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ का लादले आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते भारता हा सर्वाधिक टॅरिफ लादणार देश आहे, विशेष करुन अमेरिकेवर भारताने जास्त टॅरिफ लादले आहे. तसेच भारत रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात त्यांना इंधन पुरवत आहे.
ट्रम्प यांनी सुरुवातील भारतावर किती टॅरिफ लादले होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या सुरुवातील भारतावर २६% कर लागू केला होता, त्यानंतर हा कर २५% करण्यात आला. परंतु आता भारताने रशियाकडून तेल खरेदी केली नसल्यामुळे हा कर ५०% करण्यात आला आहे.