
ट्रम्पच्या टॅरिफ वाढीनंतर नितीन गडकरींचे मोठे विधान !
आपल्याकडे संपूर्ण जगाची बाजारपेठ आहे आणि आपण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत. जगात असे फार कमी देश आहेत जे कमी किमतीत चांगल्या दर्जाचे उत्पादने देत आहेत आणि भारत त्या देशांमध्ये आहे.’असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
त्यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्क्रमात भारतीय अर्थव्यवस्थेविषयी हे महत्वाचे विधान केले आहे. एकीकडे अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावला आहे त्याच वेळी गडकरींचे हे विधान आले आहे,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी, “जागतिक अर्थव्यवस्थेत आपले योगदान लवकरच वाढणार आहे. आपल्याला जागतिक बाजारपेठ मिळणार आहे, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था खूप पुढे जाईल” असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी, “शेती, ग्रामीण आणि जंगल यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर शेतीचा जीडीपीमध्ये २२ टक्के वाटा असेल, तर भारतीय अर्थव्यवस्था आपण जिथे विचार करत आहोत तिथे पोहोचू शकते” असा मोठा दावा देखील त्यांनी केला.
तसेच केंद्रीय मंत्री रस्ते पायाभूत सुविधांबद्दल बोलताना म्हणाले की, आपल्या देशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये वेगाने सुधारणा झाली आहे. ज्यामुळे लॉजिस्टिक्समध्ये मोठी सुधारणा झाली आहे. “एका संशोधनाचा संदर्भ देत ते म्हणाले की, “पूर्वी भारतात लॉजिस्टिक्सचा खर्च १६ टक्के होता, परंतु आता तो ६ टक्क्यांनी कमी झाला आहे. ते म्हणाले की, डिसेंबरपर्यंत तो ९ टक्क्यांवर येईल आणि पुढे तो ७ टक्क्यांवर येईल.
नितीन गडकरी यांनी यावेळी,जर रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर १ रुपया खर्च केला तर अर्थव्यवस्था ३ रुपयांनी वाढते. म्हणूनच, आम्ही रस्ते पायाभूत सुविधा आणखी मजबूत करत आहोत, जेणेकरून भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. असे म्हटले. तसेच नितीन गडकरी यांनी,”आतापर्यंत आम्ही या वर्षी देशात २.५ लाख कोटींचे काम केले आहे आणि डिसेंबर अखेरपर्यंत आम्ही १० लाख कोटींचे काम करू. असे म्हटले आहे.
त्यासोबतच, मी अमेरिकेच्या निर्णयावर भाष्य करू नये. आम्ही एका किंवा दोन देशांवर अवलंबून नाही, आमची जागतिक बाजारपेठ आहे. आमची ऑटो अनेक देशांमध्ये निर्यात केली जात आहे. ते म्हणाले की, चिप्ससारख्या गोष्टींमध्ये समस्या आहे. तथापि, आम्ही अनेक गोष्टी निर्यात करत आहोत.” असे म्हणत त्यांनी काही मुद्द्यांवर बोलणे टाळले. तसेच ते म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे आणि येणाऱ्या काळात आमची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा माझा विश्वास आहे.