
दैनिक चालु वार्ता म्हसळा – (रायगड) अंगद कांबळे
म्हसळा -श्रीवर्धन राज्य मार्गावर मौजे सकलप येथील गोपालक शेतकरी कानु कांबळे यांची दुभती गाय वासरू चरण्यासाठी गावा शेजारील जंगलात गेली असता मोकाट कुत्र्यांनी गाईच्या वासरावर जीवघेणा हल्ला केला होता.याच वेळी जांभूळ ग्राम पंचायत सरपंच सदर मार्गावरून आपले ताब्यातील ऑटो रिक्षाने म्हसळाकडे येत असताना त्यांना रस्त्याचे कडेला चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी वासरावर हल्ला केल्याचे निदर्शनास आले.सरपंच मोरे यांनी कर्तव्य दक्षात दाखवून शिताफीने रक्तबंबाळ झालेल्या वासराला कुत्र्यांचे तावडीतून मुक्त करून त्याला रिक्षात बसून उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.झालेली घटना मोरे यांनी म्हसळा तालुका माजी सभापती महादेव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.पाटील यांनी सोशल मीडियाचे माध्यमातून गाय वासराचे मालकाचा शोध घेतला आणि त्यांचे ताबेत दिला.मृत्यूच्या दाडेत गेलेल्या वासराला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले आहे.याचे सर्व श्रेय प्राणी मित्र जांभूळ सरपंच किरण मोरे यांना जात असल्याने जांभूळ सरपंच मोरे यांनी केलेल्या सतकृत्याचे म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप कहाले यांनी पोलिस ठाण्यात पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार केला आणि धन्यवाद दिले.सत्कारावेळी माजी सभापती महादेव पाटील,रिक्षा चालक किशोर गाणेकर,अविनाश जंगम, उपस्थित होते.