
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळा आहे हा आमचा आरोप नाही तर दावा आहे. याकरिता आयोगाने राहूल गांधी यांना शपथपत्र मागण्याची गरज नाही. बंगालच्या एक माणसाच्या खोलीत 80 लोकं राहतात तर राम कमलदास नावाच्या माणसाला 45 पोर दाखवण्यात आली आहे.
त्यांची सर्वांची नावे मतदारयादीत आहेत. निवडणूक आयोगासाठी एवढा पुरावे पुरेसे नाहीत का ? मग आत्ताच मतदारयाद्यांमध्ये ‘एरर’ कसे यायला लागले अशी विचारणा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळाचे अनेक पुरावे समोर आणले आहेत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून ते रोज धक्के देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला समर्थन दिले आहे.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता निवडणुकीची गरजच राहिली नाही, निवडणूक घेण्यापेक्षा निवडणूक आयोगाने निकालच जाहीर करावा. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commssion) घोळाची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.
मतदारयाद्यांमध्ये नोव्हेंबर 2024 पासूनच घोळ सुरू झाला होता. हे मी वारंवार सांगत होते. निवडणूक आयोगाच्या समितीतून सरन्यायाधिशांना वगळले तेव्हापासून या कटाला सुरुवात झाली होती. हा कट आता उघडकीस आला आहे. सर्वच पक्षांनी मतदारयाद्यांचा शोध घेतला जात आहे. पडताळणी करण्यास सांगताच आता वेबसाइटवरून मतदार याद्याच गायब केल्या जात आहेत. ऑन लाइन शोध घेतल्यास एरर दाखवल्या जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
आमचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोगाला एवढी लपवाछपवी करण्याची काही गरज नव्हती. चोर के दाढी मे तिनका अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले झाले आहेत. पक्षांतर कायदा पायदळी तुडवून पक्ष स्थापन करता येत नाही, या मूलभूत नियमाला फाशी देऊन कॉम्प्रमाईज करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ज्यांनी फोडले ते त्यांच्यात हातात सोपवले असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केली.