दैनिक चालु वार्ता वर्धा – उपसंपादक-अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :- तालुक्यातील तळेगाव (श्या.पंत ) येथे आठवडी बाजार आटोपून घरी जात असताना मोपेडला झालेल्या अपघातात वडील जागेवरच ठार झाले असून मुलगी जखमी झाली आहे प्राप्त माहितीनुसार, तळेगाव नजीकच्या रानवाडी येथील रहिवासी पंजाब माहुरे(७५) आणि मुलगी वैशाली भगत(३५) आठवडी बाजार आटोपून रानवाडी गावाकडे निघाले असता नजीकच्या नागलीया पेट्रोल पंपावर मोपेड दुचाकीत पेट्रोल भरून बाहेर निघताच आर्वीच्या दिशेने जात असतांना विरुद्ध बाजूने उभ्या असलेल्या ट्रकवर मोपेड धडकली त्यात पंजाब माहुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर मागे बसलेली मुलगी वैशाली जखमी झाली सदर अपघात शनिवार सायंकाळी अंदाजे ५ :३० ते ७ :०० वाजता दरम्यान घडली असल्याचे मृतकाचा मुलगा जीवन माहुरे (३९) याने दिलेल्या पोलीस रिपोर्ट मध्ये म्हटले आहे अपघातग्रस्त दुचाकी क्रमांक एम.एच.३२ डब्ल्यू ३६८५ असा असून अज्ञात वाहनाला कुठलाही सुरक्षा उपाय नसल्यामुळे दुचाकी चालकाला पुढील वाहन दिसून आले नाही त्यामुळे सदर अपघात घडल्याचे म्हटल्या जाते अपघात घडतात चालकांने वाहनासहित पळ काढला त्यामुळे अज्ञात ट्रक चालका विरुद्ध तळेगाव पोलीस स्टेशन मध्ये बीएनएस १०६(१)१२५(ब)२८५ मोटर वाहन अधिनियम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाई तळेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश भोयर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडारे, पो. हवालदार निखिल काळे करीत आहे