
भाईंचं टेन्शन वाढलं…
पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, एखादी, दुसरी जागा अपवाद असू शकतो, मात्र महायुती हाच पहिला पर्याय आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, तसेच महायुतीमधील अनेक नेत्यांनी देखील तीच भूमिका मांडली आहे.
मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीचं या निवडणुकांबाबत कोणतंही चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी आता पक्षांतरणाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या काही दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच हे पक्ष प्रवेश सुरू आहेत. मात्र आता दुसरीकडे भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. ऐन महापालिकास निवडणुकीपूर्वी शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष येरुणकर हे वार्ड क्र 11 चे शिवसेना शाखाप्रमुख आहेत, त्यांनी आज शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुभाष येरुणकर गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेत होते, पण आज त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धक्का
सध्याचं राजकीय वातावरण पाहाता यावेळेची महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होण्याची शक्यता आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वी शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. सुभाष येरुणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापुरातही धक्का
दरम्यान गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांना सोलापुरातही मोठा धक्का बसला होता, अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यानंतर आता येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.