
अमेरिकेतून सर्वात मोठी बातमी समोर…
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक महत्त्वाच्या देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकताच भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. मात्र ट्रम्प यांचा हा निर्णय आता त्यांच्यावरच उलटताना दिसत आहे, अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे.
टॅरिफमुळे अमेरिकेमधील ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या महागाईमध्ये जुलै महिन्यात उल्लेखनीय वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ठोक विक्रेते आता हळूहळू टॅरिफमुळे वाढलेल्या किंमतींना आपल्या वंस्तुच्या मुळ किमतीमध्ये मिळवत असल्यामुळे देशात महागाई प्रचंड वाढली असून, सामान्य लोकांना मोठा भार सोसावा लागत आहे.
या वस्तुंचे वाढले रेट
ब्लूमबर्गने केलेल्या एका सर्व्हेनुसार जुलै महिन्यामध्ये अमेरिकेच्या महागाई निर्देशांकात 0.3 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर जूनमध्ये 0.2 टक्के एवढी वाढ झाली होती. अमेरिकेला महागाईचा याही पेक्षा अधिक झटका बसू शकतो, मात्र तिथे इंधनाचे दर कमी असल्यामुळे सध्या तरी महागाईची झळ एवढी अजून बसली नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र ही परिस्थिती अशीच राहिली तर अमेरिकेमध्ये महागाईचा आगडोंब उसळू शकतो असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. इंधन सोडता जवळपास इतर सर्वच वस्तुंचे दर अमेरिकेमध्ये वाढले आहेत.
भारतावर 50 टक्के टॅरिफची घोषणा
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आधी 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती, मात्र त्यानंतर पुन्हा 25 टक्के अतिरिक्त टॅरीफ लावण्यात आला आहे. भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे, त्यासाठी दबावतंत्र म्हणून ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, मात्र भारतानं देखील अमेरिकेला जशासतसं उत्तर दिलं आहे. आता भारताकडून देखील अमेरिकेमधील काही ठरावीक वस्तुंवर प्रत्युत्तर कर लावण्याची तयार सुरू झाली आहे, त्याचा मोठा फटका हा अमेरिकेला बसू शकतो, ट्रम्प भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा निर्णय मागे देखील घेऊ शकतात असा अंदाज काही अर्थतज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.