
दैनिक चालू वार्ता माळशिरस प्रतिनिधी – राजेंद्र पिसे
नातेपुते:मोरजाई विद्यालय, मोरोची येथील विद्यार्थिनी कु. भक्ती कुलभूषण रोटे हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत नातेपुते केंद्रातून 95.60% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ (माजी सदस्य – सोलापूर जिल्हा नियोजन समिती व सदस्य – लाडकी बहीण योजना, माळशिरस तालुका) यांच्या हस्ते तिचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी तालुका उपप्रमुख सुनील साठे, नातेपुते शहरप्रमुख पै. निखिल पळगे, अक्षता सपकाळ, सागर राऊत, मयूर ठोंबरे, नाथा रुपनवर, वनवे सर, मंगेश अवघडे, कृष्णा पाटोळे तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.