
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम/रिसोड -भागवत घुगे
रिसोड तालुक्यातील परिसरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. काही ठिकाणी ढगफुटी या पावसामुळे नुकसान पिकांना जीवदान मिळणार आहे. रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त मानला जात आहे.
गेल्या पंधरवड्यापासून पाऊस न पडल्याने शेतकरी राजा पोळा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. मात्र दोन दिवसांपासून संततधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या जिवात जीव आला आहे.
पोळा सण पाच दिवसांवर आला असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाने उशिरा का होईना दर्शन दिले. त्यामुळे श्रावणी पोळ्यासाठी शेत शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे. शेतकरी कितीही संकटात असला तरी चालत आलेल्या रूढी,
तालुक्यात पाऊस
दोन दिवसांपासून रिसोड
तालुक्यातील किनखेडा रिठद आसेगांव हराळ मांडवा मोप लोणी
मंडळांत पावसाला सुरुवात झाली.
काही भागात ढगफुटी पिकाची नुकसान झाले तर कुठे जोरदार पाऊस झाला. यामुळे रबी हंगामाच्या आशा
पल्लवित झाल्या आहेत.
परंपरा एकदम तोडत नाही. वर्षभर शेतात काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा-राजाचं आजच्या पोळ्यानिमित्त उतराई व्हावे लागते.
रिसोड तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पावसाच्या काळजीत तर अतिवृष्टी होणार असल्याचे भिती वाटत आहे बळीराजा काही प्रमाणात सुखावला. त्यामुळे घरातील दुःख बाजूला सारत शेतकरी आपल्या सर्जा-राजाच्या सणासाठी सज्ज झाला आहे.