
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
भारतीय स्वातंत्र्याचा 79 वा स्वातंत्र्य दिन अगदी आनंद उत्सवात ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात साजरा करण्यात आला ,या कार्यक्रमासाठी बहुसंख्य गावकरी मंडळी ,प्रतिष्ठित नागरिक ,उपस्थित होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाशजी कायंदे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य भागवतराव घुगे हे प्रमुख होते .तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सरपंच बद्री भाऊ कायंदे ,प्रतिष्ठित नागरिक एम.डी.राठोड, रामभाऊ राठोड, विष्णुपंत कायंदे तसेच भारतीय सैन्यात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी गोपीचंद राठोड ,अर्जुन राठोड हे उपस्थित होते. तसेच बी पी शिरसाट प्रमुख उपस्थितांमध्ये होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष अविनाशजी कायंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विद्यार्थिनींनी आपले स्वातंत्र्य विषयी, वर्तमान काळातील भारताची प्रगती, भारतातील स्त्रीशक्ती, युवाशक्ती यावर विचार व्यक्त केले .ज्यामध्ये पुनम संतोष कायंदे, दिव्या सुरेश गायकवाड ,गायत्री शेषराव गरकळ, साक्षी संजय लहाने .या विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले.ज्यामध्ये पायल संतोष जुमडे हिने स्वागत गीत सादर केले.
व्यासपीठावरून बोलताना प्रमुख अतिथ बद्रीभाऊ कायंदे यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे संधीचे सोनं करावं ,तसेच आपल्या अभ्यासावर कशाप्रकारे फोकस करावा,शिक्षणाशिवाय पर्याय नाही.याविषयी विचार व्यक्त केले .तसेच या प्रसंगी बी पी शिरसाट सर यांनी आपले विचार व्यक्त केले.तर स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य घुगे सरांनी शाळेच्या यशोगाथे बरोबरच स्वातंत्र्यवीरांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले बहुमोल योगदान यावर प्रकाश टाकला .अध्यक्ष म्हणून अविनाश कायंदे यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर मांडले तसेच सर्व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी बहुसंख्य गावकरी मंडळी उपस्थित होते .कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक मंडळीचे बहुमोल असे योगदान लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एस. दवंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन बि.डी.जाधव यांनी केले.