दैनिक चालु वार्ता ठाणे ग्रामीण प्रतिनिधी- विकी जाधव
—————————
ठाणे : ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार, ठाणे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दि. १८ ऑगस्ट २०२५ आणि दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
या आदेशानुसार सर्व शाळा या दोन दिवस बंद राहणार असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.