
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-प्रशांत देशमुख
कोंढवे-धावडे (भीमनगर):सविस्तर वृत्त.”ज्ञानेश्वरी रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्थेच्या एन ए सोसायटीच्या इमारतीमधील नागरिक गेल्या १२ वर्षापासून पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.ज्ञानेश्वर कॉलनी असणाऱ्या परिसरात साधारण १०० ते १२५ कुटूंब राहतात.ही कॉलनी अगदी भीमनगर बस स्टॉप च्या समोरच आहे, शहरीकरण होताना इथल्या नागरिकांना मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे.रात्री सात नंतर महिलांनी बाहेर पडायचे वांदे आहेत एवढा रस्ता खराब आहे. रस्त्याला दिवे नाहीत. महिलांना रोडवरून गाड्या चालवताना कसरत करावी लागते. महानगरपालिकेत गावं जाऊन आता ५ वर्ष होऊन गेली आहेत तरीसुद्धा कोणत्याच सोयी सुविधा देऊ शकली नाही पालिका हे कुणाचे दुर्दैव?
. सोसायटीच्या वतीने एक शिष्टमंडळ वारजे-कर्वेनगर विभागीय तत्कालीन सहायक आयुक्त श्री नायकल साहेब यांना भेटले होते. त्यावेळी या कॉलनीला रस्त्ता करून देण्याबाबत योग्य ती पाऊले उचलली जातील असे पत्र शिष्टमंडळ यांना दिले होते. त्या नंतर आयुक्त यांची बदली झाली व नवीन सहायक आयुक्त श्री राऊत साहेब यांनी चार्ज घेतला,त्यानंतर सोसायटीच्या वतीने चेअरमन श्री देशमुख साहेब यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला असता. पालिकेकडून सहायक आयुक्त श्री राऊत साहेब व त्यांच्या इतर अधिकारी यांनी भेट दिली व रस्त्या सबंधि तांत्रिक अडचणी काय आहेत याचा पाढाच वाचला.तांत्रिक अडचणीमुळे पालिका रस्ता करून देण्यास असमर्थ आहे असे सांगण्यात आले व या तांत्रिक अडचणी दूर होत नाहीत तो पर्यंत येथील नागरिकांनी चिखलाच्या, ओबड, खड्डे असणाऱ्या रस्त्यावरूनच येजा करावी लागेल असेच सुचवून गेलेत.
. लोकप्रतिनिधीच्या कडे लोकांनी आपली बाजू मांडली तर प्रशासन करून देत नाही तिथे आम्ही कसे करू शकतो म्हणून येथील प्रतिनिधी यांनी अंग काढले. नागरिक फक्त मतदानापुरते हवे असतात बाकी त्यांचा तसा काही उपयोगच नाही अश्या प्रकारे नागरिकांना जमेत धरतात यामध्ये नागरिकांची काय चूक. येतील नागरिक आता येणाऱ्या पालिका निवडणुकीत “मतदानवर्ती बहिष्कार” टाकण्याचा विचार करीत आहे असे सांगण्यात आले.
.