
दैनिक चालु वार्ता उस्माननगर (प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :-आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजरो येथे १५ ऑगस्ट रोजी शिखरावर जाऊन भारतीय तिरंगा झेंडा फडकावून मायदेशी भारतात नांदेड येथील हुजूर साहीब रेल्वे स्थानकावर दि.१९ ऑगस्ट रोजीआगमन झाल्यानंतर परिवाराने जंगी स्वागत केले.
उस्माननगर पोलिस स्टेशनच्या सपोउनि म्हणून कार्यरत असलेल्या सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे -आनेराव या दि ९ ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेल्या टांझानिया देशातील किलोमांजारो या शिखरावर जाण्यासासाठी नांदेड येथुन रवाना झाल्या त्यानंतर शिखरावर जाण्यासाठी दि. ११ ऑगस्टला सुरूवात केली तर दि.१५ ऑगस्ट ला सकाळी शिखरावर जावून ९: ३० मिनिटानी शिखरावर भारतीय तिरंगा झेंडा फडकविला.
सौ.लोपामुद्राआनेराव – कुबडे या धाडसी व कर्तृत्ववान महीला पोलिस अधिकारी म्हणून पोलिस खात्यात ओळख आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय समजून दक्षिण आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजरो येथील उंच टेकडीवर जाऊन झेंडा फडकावून नाव सुवर्ण अक्षरांनी व उस्माननगर नांदेड पोलीस खात्याची मान उंचावली आहे.
दि.१९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी नांदेड येथील रेल्वेस्टेशन येथे आगमन झाले. रेल्वेस्टेशन येथे त्यांचे ढोलताश्याच्या गजरात व पुष्पहार , पुष्पगुच्छ देवून परिवाराकडून जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुशील कुबडे सतीश कुबडे ,सौ.कांचन कुबडे ,श्रीमती कुसुमताई कुबडे,ओम कुबडे,जगदीश कुबडे,जनयु कुबडे ,राजू भोकरकर, बालाजी भोकरकर, महेश हळीकर ,चंद्रकांत बिरादार, पोलीस अधिक्षक कार्यालयातील भगत मॅडम व त्यांचे पती यांची उपस्थिती होती.