
मुंबईतील आंदोलनापूर्वी वर्ष निवास्थानी विशेष बैठक; तब्बल दीड तास खलबतं !
मराठाआंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील 29 ऑगस्टचं आंदोलन सुरु होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात हालचालीकरण्यातआल्याचेचित्र आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.
त्यासंदर्भातील तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरु आहेत. तरदुसरीकडॆ मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन सुरु होण्यापूर्वीच राज्य सरकार सक्रीय झाल्याचं बघायलामिळतआहे. मराठा आरक्षणाच्याविषयाला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरती तब्बल दीड ते दोन तास खलबते चालल्याचीमाहितीसमोरआलीआहे.
मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या ऐन गणेशोत्सवात आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर वर्षा निवासस्थानीचर्चाझाल्याचीमाहितीआहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी विशेष रणनीती आखली गेल्याचेदेखीलबोललंजातआहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी महायुती सरकार महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते, अशीमाहिती विश्वसनी सूत्रांनीदिलीआहे.
मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर वर्षा निवासस्थानीचर्चा
मिळालेल्यामाहितीनुसार, गणेशोत्सव काळामध्ये जरांगे पाटील मुंबईत आले तर मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईत गर्दी असते. यादरम्यान धामधुमीच्याआणिगर्दीच्याकाळात मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन मुंबईत धडकलं तर मुंबईकरांची कोंडी होऊ शकते. त्यामुळेसंभाव्यपरिस्थितीलक्ष्यातघेतायामुद्द्यावरतोडगाकाढण्यासाठीशाशनदरबारीआताहालचालींनावेगप्राप्तझालाआहे.
मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरु आहेत. मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन सुरु होण्यापूर्वीच राज्य सरकार सक्रीय झाल्याचं मराठा आरक्षण उपसमितीच्या पुनर्गठनातून दिसून येत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे. त्यामागणीला ओबीसींचा विरोध आहे. दरम्यान, कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना ओबीसीतून लाभ घेता येतो. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम देखील सुरु करण्यात आली होती.
मनोज जरांगेंच्या आंदोलनापूर्वी मोठ्या घडामोडी
दुसरीकडे, मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील हे या उपसमितीचे अध्यक्ष होते. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या आधी राज्य सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलं आहे.