
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी -रवि राठोड
पालघर : (सफाळा) आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांदरम्यान कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी सफाळा पोलिसांनी शुक्रवारी दंगा नियंत्रण सरावासोबतच रूट मार्चचे आयोजन केले.
मार्चची सुरुवात सफाळा पोलीस ठाण्यातून झाली. सफाळा बाजारपेठ, नारोडानाका, मालकरीपाडा, भोईरपाडा, डोंगरी, कर्दळमार्गे पुन्हा पोलीस ठाण्यात मार्चची सांगता करण्यात आली.
या सरावामध्ये १ अधिकारी आणि २० पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एसएलआर-२, अँटी राईट गन-१, बाराबोअर-२, हेल्मेट-२१, लाठी-२१, ढाली-१० आणि १ सरकारी वाहन यांचा वापर करण्यात आला.
सणाच्या काळात नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले.