
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच पाकिस्तानातील विशाल इंधनसाठ्याबाबत एक वक्तव्यं केले होते. ट्रम्प यांनी सोशल ट्रुथवर पोस्ट करुन सांगितले होते की दोन्ही देश इंधनसाठा विकसित करण्यासाठी एकत्र काम करतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तर एवढेही सांगितले की आता भारत देखील पाकिस्तानकडून तेल विकत घेईल. यावरुन पाकिस्तान देखील बुचकळ्यात सापडला आह की आपल्याकडे एवढे इंधन आले कुठून ?
ट्रम्प यांच्या दाव्यावर पाकची सरकारी कंपनी हैराण
पाकिस्नानची सरकारी इंधन आणि गॅस कंपनी देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर आश्चर्य व्यक्त केले आहे. कंपनीने ट्रम्प यांचा पाकिस्तानात मोठा इंधनसाठा असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. फायनान्शियल टाईम्सच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या दाव्यांना पोकळ म्हटले आहे. त्यांनी सांगितले की पाकिस्तानात असे कोणतेही रहस्यमय इंधन क्षेत्र नाही जे एक अब्ज बॅरल तेल उत्पन्न करु शकणार आहे.
आपल्या गरजेच्या ८० टक्के इंधन आयात करतो पाकिस्तान
पाकिस्तान त्यांच्या गरजेच्या ८० टक्के इंधन आयात करतो आणि त्याचे दैनिक तेल उत्पादन देखील भारताच्या सुमारे दहाव्या हिश्याच्या बरोबर आहे. अमेरिकेन ऊर्जा सूचना प्रशासन (EIA) च्या २०१५ च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या सिंधु बेसिन क्षेत्रात ९ अब्ज बॅरलहून अधिक इंधन असू शकते. कन्सलटन्सी फर्म रिस्टॅड एनर्जीनुसार EIA ने केवळ प्रारंभिक चाचण्यांच्या आकड्याआधारे अंदाज लावला होता. परंतू याची खातरजमा केलेली नव्हती.
जेव्हा पासून ट्रम्प यांनी पाकिस्तानात इंधन साठे असलेल्याचे सांगितले आहे तेव्हापासून शहबाज सरकारचे अधिकारी आपल्याच देशातील इंधन शोधण्याच्या आपल्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांना दूर करण्यासाठी याचा वापर करण्याचे स्वप्न दाखवत आहेत.
साल २०१९ मध्ये पाकिस्तानचेतत्कालिन पीएम इम्रान खान यांनी घोषणा केली होती की इटलीच्या एनी आणि अमेरिकन इंधन-गॅस कंपनी एक्सॉन अरबी समुद्रात एक विहिर खणत आहे. ज्यामुळे येत्या ५० वर्षे त्यांना इंधन खरेदी करण्याची गरज लागणार नाही.या वक्तव्याच्या काही तासानंतर कंपनीने सांगितले की त्यांनी या प्रकल्पाला खूपच आधी बंद केले आहे, कारण तेथे पाण्याशिवाय काहीच मिळालेले नाही.