
मराठा आरक्षण अन् आंदोलनावर उदयनराजे भोसले पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांना केली विनंती…
मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत उपोषण करायला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू आहे. काहीही झालं तरी ओबीसीतून आरक्षण घेणार, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे.
त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव आझाद मैदानात येत आहेत. भाजप नेते आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती सुद्धा केली आहे.
काय म्हणालेत उदयनराजे भोसले?
माझ्या पोटात असतं तेच माझ्या ओठात असतं जे योग्य आहे तेच मी योग्य म्हणत असतो, माझी प्रकृती बरी नाहीये म्हणून मी आरक्षणाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही. या आधी मी अंतरवालीला गेलो होतो. शासनाने लवकरात लवकर या आंदोलनावर तोडगा काढावा. जे आंदोलन करतायेत त्यांच्या प्रमुखांसोबत बोलून लवकरात लवकर मार्ग काढावा. मला कालच डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे मी तिथे येऊ शकत नाही. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत अजून बोलणं झालं नाही. मात्र माध्यमांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना विनंती आहे, आंदोलनकर्त्यांसोबत बसून काय तोडगा काढता येईल हे पाहावं. मनोज जरांगे यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी, असं आवाहन उदयनराजे यांनी केलं असून आंदोलकांना मूलभूत सुविधा शासनाने पुवाव्यात असं सुद्धा उदयनराजे म्हणाले आहेत.
शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा
मी याआधी देखील कोणताही विषय असो जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं आहे. कोणत्याही परिणामाला मी कधी घाबरलो नाही. माझी प्रकृती बरी नव्हती, परवाच मला डिस्चार्ज मिळाला आहे. आधी मी अंतरवाली सराटीला गेलो होतो. मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा दुसऱ्या कोणताही विषय असो मी धावून जात असतो. शासनाने लवकरात लवकर या सर्व गोष्टींवर तोडगा काढावा. सरकारने आंदोल नातील प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करावी आणि यातून लवकरात लवकर मार्ग काढावा ही माझी तुमच्या मार्फत मागणी आहे. माझी आणखी एक विनंती देखील आहे, जे आंदोलनकर्ते आहेत यांच्यासोबत लवकरात लवकर बसावं आणि तोडगा कसा काढता येईल आणि त्यातून लवकरात लवकर मार्ग कसा निघेल हे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत आणि ते लवकरात लवकर झाला पाहिजे. माझे एवढेच सांगणं आहे. मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. उपोषणाला बसलेले लोक आहेत त्यांच्यावर देखील त्यांचा परिवार अवलंबून आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांची जी काही कमिटी असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत, त्या त्यांना पुरवाव्यात असं उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.