
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांना टार्गेट करत थेट गोळ्या झाडल्या. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या विरोधात राबवले.
मात्र, दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली. फक्त हेच नाही तर मोठ्या प्रमाणात हल्ले केली जात होती. आता भारताचे टेन्शन वाढवणारी एक अत्यंत मोठी बातमी ही पुढे येताना दिसत आहे. पाकिस्तानबद्दलचा एक अहवाल हा पुढे आला आहे. हा अहवाल पाकिस्तानातील अण्वस्त्रांशी संबंधित आहे. बुलेटिन ऑफ अणुशास्त्रज्ञांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा एक मोठा आढावा घेतला, ज्यामधून खळबळ उडवणारी माहिती पुढे आलीये.
नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडे आताच्या परिस्थितीला 170 अण्वस्त्रे आहेत. अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेने 1999 मध्ये अंदाज लावला होता की 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 अण्वस्त्रे असतील. मात्र, तसे न होता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पाकिस्तानकडून खूप मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे विकसित करण्यात आली आहेत. हा अत्यंत मोठा धोका जगासाठी नक्कीच असणार आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होताना दिसत आहे.
यासोबतच रिपोर्टमधून अजून एक मोठा दावा करण्यात आला आहे की, पाकिस्तानने अण्वस्त्रे वाहून नेण्यासाठी मोठी सक्षम अशी काही शस्त्रे तयार केली आहेत. पाकिस्तानकडे चार प्लुटोनियम उत्पादन अणुभट्ट्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात युरेनियम समृद्धीकरण पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळेच आता येत्या काही वर्षात पाकिस्तानातील अण्वस्त्रे आणखीन वाढू शकतात आणि तशी दाट शक्यता देखील आहे.
भारतापेक्षा पाकिस्तान हा अण्वस्त्रे वाढवत आहे. हेच नाही तर जर भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये वाढ केली तर लगेचच पाकिस्तान देखील करणार आहे. यावर अजूनही पाकिस्तान सरकारने कोणतेही विधान केले नाहीये. मात्र, पाकिस्तानमध्ये वाढणारी अण्वस्त्रे यामुळे जगाने धसकी घेतली आहे. सातत्याने संख्येत वाढ होताना दिसत आहे. आता यावर भारत नेमकी काय भूमिका घेतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. पाकिस्तान दिवसेंदिवस अण्वस्त्रांवर काम करतोय.