
डोळ्यात अश्रू आणणारा अंत; मृत्यूनंतर 7 चित्रपट रिलीज…
बॉलिवूड अभिनेते ओम शिवपुरी यांनी सिनेमात 70-80 च्या दशकात सिनेमांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या. अभिनेते ओम शिवपुरी यांची खरी कहाणी अत्यंत रंजक आहे.
मोठ्या पडद्यावर ते जरी एक भयानक खलनायक म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांच्या खऱ्या आयुष्यात ते कोणत्याही हिरोपेक्षा कमी नव्हते. मात्र, त्यांचा शेवट अत्यंत दुःखद झाला. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, त्यांच्या निधनानंतर तब्बल 7 वर्षे त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत राहिले. आपल्या कारकिर्दीत ओम शिवपुरी यांनी 175 हून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले.
बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या चित्रपटांमधील भूमिका मृत्यूनंतर देखील चर्चेत असतात. अशाच दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते ओम शिवपुरी. त्यांनी एक प्रभावी खलनायक म्हणून सिनेसृष्टीत भक्कम ओळख निर्माण केली होती. ओम शिवपुरी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1971 मध्ये मणि कौल दिग्दर्शित आषाढ का एक दिन या चित्रपटातून केली. त्यानंतर 1972 मध्ये गुलजार यांच्या कोशिश चित्रपटात त्यांना संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.
कोशिश नंतर त्यांच्या चित्रपटांचा अक्षरशः वर्षावच झाला. नमक हराम, आंधी, खुशबू, शोले, मौसम, बालिका वधू, पति पत्नी और वो हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट ठरले, ज्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. जर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर ते खऱ्या आयुष्यातदेखील एखाद्या हिरोपेक्षा कमी नव्हते.
मिडिया रिपोर्टनुसार, पटियाला येथे जन्मलेले ओम शिवपुरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जालंधर रेडिओ स्टेशनवर काम करून केली. याच ठिकाणी सुधा शिवपुरी आधीपासून काम करत होत्या. इथूनच त्यांचं प्रेम फुललं. नंतर ओम आणि सुधा नवी दिल्लीला गेले आणि एनएसडी (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) मध्ये प्रवेश घेतला. 1963 मध्ये दोघे एकत्र पदवीधर झाले.
ओम आणि सुधा यांनी 1968 मध्ये लग्न केलं आणि अभिनय क्षेत्रात एकत्र काम सुरू केलं. त्यांच्या मेहनतीमुळे दोघंही यशस्वी ठरले आणि थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. मात्र, 1990 मध्ये ओम शिवपुरी यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अचानक मृत्यू झाला. हा चित्रपटसृष्टीसाठी मोठा धक्का होता. यानंतर ओम आणि सुधा वेगळे झाले. ओम यांच्या निधनानंतर तब्बल 15 वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये सुधा यांचंही निधन झालं. ओम आणि सुधा यांना दोन मुले आहेत – एक मुलगी ऋतु शिवपुरी आणि मुलगा विनीत. ऋतु शिवपुरी ही देखील बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.