
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवाजवी टॅरिफ लादल्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील तसेच ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशातच ट्रम्प यांच्या पाठिशी उभे राहणारे उद्योगपती एलॉन मस्क यांनी थेट ट्रम्प यांचे समर्थक पीटर नवारो यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
काही दिवसांपासून ट्रम्प यांचे समर्थन करताना नवारो भारतावर नाहक टीका करत होते. त्यावरून मस्क यांनी त्यांना समाज माध्यमावरून खडसावले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या अवाजवी टॅरिफमुळे अमेरिकेत दोन गट पडले आहेत. काहींचा ट्रम्प यांच्या भूमिकाला समर्थन तर काहींनी थेट विरोध केला आहे. याच टॅरिफ वादात एलॉन मस्क यांनीही उडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचे पीटर नवारो समर्थन करत असताना मस्क यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. याआधी ट्रम्प यांना साथ देणारे मस्क आता थेट ट्रम्प यांच्याविरोधात गेले आहेत.
पीटर नवारो यांनी काही दिवसांपूर्वी भारत विरोधात गरळ ओकणारे ट्वीट मस्क यांच्या X या समाज माध्यमावर केले होते. नवारो यांनी दावा केला होता की, भारत रशियाकडून तेल विकत घेतो. हे पैसे रशिया युक्रेननिरोधात युद्धासाठी वापरतो. यावरून मस्क यांनी कम्युनिटी नोट्सच्या माध्यमातून नवारो यांचा ट्विट किती तथ्यहीन आहेत, याची माहिती देताना नवारो यांना चांगलेच सुनावले आहे. नवारो हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असून ते त्यांचे व्यवसायविषयक सल्लागारदेखील आहेत.
ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यापासून नवारो कायम भारताला लक्ष्य करत आहेत. अलीकडेच X या समाज माध्यमावर भारतविरोधी पोस्ट लिहिली होती. यात भारताकडून आलेला तेलाचा पैसा रशिया युक्रेनविरोधातील युद्धात वापरतो, असा दावा नवारो यांनी केला होता. त्यावर फॅक्ट चेकच्या माध्यमातून नवारो यांचा दावा चुकीचा असल्याचे मस्क यांना दाखवून दिले. एवढेच नाही तर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने भारत रशियाकडून तेल विकत घेतो. भारत केवळ नफ्याला समोर ठेवून व्यापार करत नाही. तसेच व्यापार करताना भारत कोणत्याही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत नाही, असे एक्सच्या कम्युनिटी नोटने सांगितले. गंमत म्हणजे अमेरिकादेखील रशियाकडून युरेनियम आणि अन्य खनिजांची खऱेदी करतो. त्यावरून अमेरिकेची ही दुतोंडी भूमिका असल्याचे एक्सच्या कम्युनिटी नोटने म्हटले.
एलॉन मस्क यांनी फॅक्ट चेक केल्यामुळे नवारो संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एक्सच्या कम्युनिटी नोटचा ‘कचरा’ असा उल्लेख करत हिणवले आहे. शिवाय एलॉन मस्क हे विदेशी प्रचार करत असल्याचाही आरोप केला होता. त्यावर हा आरोप फेटाळताना मस्क यांनी नवारो यांना चांगलेच सुनावले आहे.. एक्स हा प्लॅटपॉर्म रिअल टाइम, पारदर्शी, फॅक्ट चेक स्त्रोत आहे. आजच्या काळात नरेटिव्ह लोक स्वत:च ओळखतात. एक्स या मंचावर प्रत्येक पक्षाची बाजू समोर येते, असे म्हणत नवारो यांना सुनावलं.