
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने देगलूर तालुक्यातील मरखेल व करडखेड सर्कल मधील प्रभाग रचनेत प्रारूप यादीच्या विरोधात जाऊन आयुक्तांनी येरगीला करडखेड सर्कल मध्ये समाविष्ट करून येरगी ला तेलंगणाच्या भरवशावर सोडले असल्याचे आरोप ग्रामस्थांनी आयोजित ग्रामसभेत केले आहेत. मरखेल सर्कल मधील येरगी गावाला करडखेड सर्कल मध्ये प्रारूप यादीच्या विरोधात जाऊन समाविष्ट करताना आयुक्तांनी त्यांच्या आदेशात असे म्हंटले आहे कि येरगी गावाला आणि करडखेड ला जोडण्यासाठी जिल्हा परिषद रस्ता क्रमांक 160 हा उपलब्ध आहे असे निष्कर्ष नोंदवलेले आहे, परंतु सदरचा रस्ता क्रमांक 160 हा तेलंगणा राज्यातून जात असल्यामुळे उद्या चालून जर रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा तो रस्ता खराब झाला किंवा काही कारणास्तव रस्ता बंद झाला तर आपल्याला तेलंगणाच्या जिल्हा परिषद समोर जाऊन निदर्शने व मागण्या करावे लागणार आहेत असे येरगी ग्रामस्थांनी ग्रामसभेत म्हंटले. जर आयुक्तांनी असा युक्तिवाद केला असेल तर महाराष्ट्रातील येरगी गाव तेलंगणा राज्याच्या भरवशावर सोडले काय असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला. या संदर्भात आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी म्हटले की सदरील सर्कल मधील झालेला बदल हा फक्त सूडबुद्धीने काही राजकीय लोकांना राजकीय फायदा पोहोचण्याचा उद्देशाने केलेला दिसून येतो. आपण बाजू मांडून सुद्धा माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी आपल्याला तेलंगणाच्या भरवशावर सोडलेले आहे. अशा परिस्थितीत जर आमचे एकच गाव काढून दुसऱ्या सर्कलमध्ये टाकून आणि आम्हाला अगदी अर्धा किमी अंतरावर असलेल्या तेलंगणाच्या भरवशावर ठेवण्यात येत असेल , विकासापासून कोसो दूर असणाऱ्या येरगीला तेलंगणाच्या दयेवर जर सोडण्यात येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने आम्हाला महाराष्ट्र राज्यातून तेलंगणा राज्यातच टाकून द्यावे असा प्रस्ताव सादर करण्यात यावा सूचना ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडल्या. तेलंगणात येरगीला समाविष्ट करण्यात यावे या अनुषंगाने साधक बाधक चर्चा करण्यात आली. सदरील बदल हा मुद्दाम येरगीवर लादला असून येरगी वर अन्याय झालेला आहे आणि येरगीला मरखेल सर्कल मधून करडखेड मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच आयुक्तांच्या आदेशात लोकसंख्येचे कारण दिलेले आहे,आदेशामध्ये लोकसंख्या प्रमाणे बदल करायचे होते तर इतर गावांचा पर्याय त्यांना उपलब्ध होता जे की त्याला सलग्न आहेत. येरगी गाव तुटून असताना त्यांना येरगी गावाला करडखेड सर्कल ला जोडण्याची घाई कशामुळे केली आहे याचा जाब विचारावा अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. भौगोलिक दृष्ट्या योग्य नसताना मरखेल सर्कल मधील येरगी गावाला करडखेड मध्ये आणि करडखेड सर्कल मधील गवंडगाव ला मरखेल सर्कल मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तालुक्यात फक्त एवढेच बदल करण्यात आले आहे. इतर कोणत्याही सर्कल मध्ये बदल करण्यात आले नाही. जेवभ कि करडखेड पासून गवंडगाव हे फक्त तीन किमी अंतरावर असून त्याला १० किमी अंतरावर असणाऱ्या मरखेल सर्कल मध्ये टाकणे यावरूनच हा बदल हेतुपुरस्पर करण्यात आल्याचे आढळून येते. येरगीला मरखेल सर्कल मध्येच ठेवण्यात यावे यासाठीचे निवेदन मरखेल ,करडखेड,देवापुर ,दावनगीर ,टाकळी (ज),मरतोळी,बेम्बरा ,क्षिरसमुद्र, मुजळगा या ग्रामपंचायत मार्फत आयुक्त,औरंगाबाद, जिल्हाधिकारी नांदेड,तहसीलदार देगलूर यांना दिले आहे. निवडणूक विभाग व निर्वाचक गण रचना करताना सन २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊनच प्रभाग रचना करावी असा शासन निर्णय क्र. जिपनि -२०२५/प्र.क्र.३६ /पं. रा. २ दिनांक १२/०६/२०२५ असताना सुद्धा माननीय आयुक्तांनी असा आदेश का काढला याबद्दल चर्चा होत असून येरगीला मरखेल सर्कल मध्येच जशास तसे ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे. ग्रामसभेमध्ये संतोष पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष सायलू कांबळे,ग्राम पंचायत सदस्य विश्वनाथ बागेवार,अशोक वाघमारे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष गजानन भोकसखेडे,अशोक बरसमवार, विठ्ठल वाघमारे, विठाबाई बरसमवार, लक्ष्मीबाई घंटावार, हुलराम इज्जरवार, शिवा कांबळे, दत्तू वाघमारे, बसवंत पाटील, मारुती मन्नरवार,माधव डुमणे , चंद्रकांत सूर्यवंशी, रामलू परीट, सचिन चेंडके, विश्वनाथ भोकसखेडे, संजय वाघमारे, सरुबाई परीट, केरबा कांबळे,आदी महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .