
मराठा आरक्षणासाठी यापूर्वी घेतलेल्या निर्णयानंतर आता फडणवीस सरकारने आणखी एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9 कोटी 60 लाख रूपये वर्ग करण्यात आले आहेत.
मराठा आंदोलनात एकुण 254जणांचा मृत्यू झाला होता. यातील 96 मृतांच्या नातेवाईकांना काल 9 कोटी 60लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर याआधी 158 मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपया प्रमाणे मदत करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या सर्वांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे.
हैदराबादनंतर आता सातारा गॅझेटसाठी हालचाली
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनादरम्यान जरांगे पाटालांकडून हैदराबाद गॅझेटसह सातारा गॅझेटचीदेखील मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आता सातारा गॅझेटसाठीदेखील शासनदरबारी वेगवाग हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात दोन बैठकांचे आयोजन करण्यात आलं आहे. तर शिंदे समितीच्या अहवालाबाबतदेखील आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात काम करत असलेल्या शिंदे समितीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
विखे पाटलांचे आयुक्तांना आदेश
सातारा गॅजेटचा अभ्यास करून अहवाल सादर करा, अशा आशयाचे आदेश मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत पुणे विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. मराठा आरक्षण संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना हे आदेश दिले आहे.
https://नर्तकीचा नाद भोवला! सासुरे गावात प्रेमसंबंधातून माजी उपसरपंचाने गोळी झाडून स्वत: ला संपवलं?
जीआरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार – भुजबळ
एकीकडे मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी जीआरविरोधात आक्रमक पवित्रा घेत या जीआरविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
भुजबळांना कोलून लावणार
भुजबळांना जीआर विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. या भूमिकेवर जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ काय सरकारचा बाप लागून गेला काय? असा सवाल करत हा जीआर मराठ्यांसाठी महत्वाचा असून पोरांचं भविष्य जीआरवर अवलंबून आहे. भुजबळने 8 पानाचं पत्र देऊ द्या नाहीतर 800 पानांचं, त्याला कोलून लावणार आहेत. तो काही सरकारचा बाप नाही, त्याचंच ऐकायला त्याला काय करायचं करु द्या, सरकारने हेराफेरी करायची नाहीतर रस्त्यावर फिरु देणार नाही असा इ्शारा जरांगेंनी दिला आहे. हा जीआर कॅबिनेटने काढलायं, तूला लय अक्कल अन् बाकीच्यांना अक्कल अक्कल नाही तू लय शहाणा लागून गेला काय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कमी अन् तूला जास्त अक्कल आहे काय, दीड पुस्तक वाचले तर, तू शहाणा झाला काय? या शब्दांत जरांगेंनी भुजबळांना सुनावलं आहे.