
धक्कादायक अहवालाने उडाली खळबळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा…
डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून प्रत्येक गोष्टीवर टॅरिफ आकारत आहेत. मात्र, याचा फटका इतर देशांच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर थेट अमेरिकेला देखील बसत आहे. अमेरिकेत मागील काही वर्षांमध्ये महागाई ही सातत्याने वाढताना दिसंतय.
त्यामध्येही भारतावर लावलेल्या टॅरिफचा परिणाम थेट हा अमेरिकेतील महागाईवर दिसून येतोय. नुकताच येल विश्वविद्यालयाने दिलेल्या रिपोर्टनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडालीये. येल विश्वविद्यालयाच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयानंतर अमेरिकेत तब्बल 9 लाख लोक गरीब होतील.
टॅरिफ वाढल्याने 2026 मध्ये अमेरिकेतील गरिबांची संख्या ही 8,75,000 पर्यत पोहचू शकते. अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयाने भारतापेक्षा त्याचा वाईट परिणाम अमेरिकेला भोगावा लागेल. ग्लोबल रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, भारताचा जीडीपी ग्रोथ 6.5 टक्के वाढून 6.9 टक्के झाले. यामध्ये अमेरिकेत होणाऱ्या निर्यातीचा फक्त दोन टक्के हिस्सा आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, भारतावर या टॅरिफचा काही खास परिणाम होणार नाही. अमेरिकेतील निर्यात कमी झाली असली तरीही इतर देशांनी भारतीय वस्तूंचे त्यांच्या बाजारपेठेत स्वागत केले.
यावरून हे स्पष्ट दिसतंय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्याच अंगलट त्यांचा टॅरिफचा निर्णय आलाय. कारण इतर देशांवरील अर्थव्यवस्थेवर या टॅरिफचा काय परिणाम होईल, यापेक्षा याचा थेट परिणाम हा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसतोय. अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या चित्र हे पूर्णपणे उलटे पडल्याचे बघायला मिळतंय. टॅरिफच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका होताना दिसतंय.
भारतानंतर थेट चीनवर टॅरिफ लावण्याच्या मागणीवर डोनाल्ड ट्रम्प हे आग्रही असल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी नाटो देशांना एक पत्र लिहून थेट यावर भाष्य केलंय. भारत आणि चीनवर टॅरिफ लावण्याची भूमिका घेणारे डोनाल्ड ट्रम्प हे मात्र स्वत: रशियावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास तयार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प हे रशियाला फक्त आणि फक्त धमक्याच देताना दिसत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कारवाई करण्याची हिंमत सध्यातरी त्यांच्यात दिसत नाहीये.