
दिग्दर्शकाने केली बॉलिवूड कलाकारांची पोलखोल !
बॉलिवूड कलाकारांचे रील आणि रिअल आयुष्य हे फारत वेगळे असते, ज्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही. त्याबद्दल कधी कोणी भाष्यही केलं नव्हतं. पण चमचमणाऱ्या पडद्यामागे नक्की काय चाललेलं असतं त्याबद्दल बहुदा कोणी बोलत नाही.
पण एका बॉलिवूड दिग्दर्शकाने मात्र याबद्दल पोलखोल केली आहे. सेलिब्रिटींच्या मागण्या, त्यांचे शौक याबद्दस ते बेधडकपणे बोलले आहेत. काही स्टार्स तर सात व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. पण त्यामागे असणारी धक्कादायक कारणे जाणून कोणालाही धक्का बसेल. त्यांनी नक्की काय धक्कादायक खुलासे केले आहेत हे जाणून घेऊयात.
खाजगी व्हॅनमध्ये साहेब म्हणजे सेलिब्रिटी नग्न बसतात
ते दिग्दर्शक म्हणजे संजय गुप्ता. संजय यांनी बॉलिवूडमधील स्टार्सच्या वाढत्या खर्चाच्या मुद्द्यावर उघडपणे भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आजकाल काही स्टार्स सात व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. ते पुढे म्हणाले, “मला काही कलाकार माहित आहेत ज्यांच्याकडे सहा मेकअप व्हॅन आहेत. पहिली व्हॅन ही त्यांची वैयक्तिक जागा असते. हे खरे आहे. मी खूप गंभीर बोलतोय मला कल्पना आहे. त्या खाजगी व्हॅनमध्ये साहेब म्हणजे सेलिब्रिटी नग्न बसतात. त्यानंतर, त्याच्या शेजारी त्या सेलिब्रिटीची दुसरी व्हॅन असते. जिथे ते त्यांचे मेकअप आणि केस करतात. त्याच्या शेजारी तिसरी व्हॅन असते जिथे ते मिटींग घेतात. आणि चौथी व्हॅन असते ती त्यांची जिम व्हॅन असते जिथे ते व्यायाम करतात.”
सेटवर 11 व्हॅन असतात
एवढंच नाही तर त्यांनी पुढे स्टार कपल्ससाठीच्या व्हॅनबाबत, खर्चाबाबत धक्कादायक खुलासा करत म्हटलं, “सेटवर एक शेफ असतो आणि तो दिवसभर फक्त त्यांच्या डाएटनुसार त्यांचे जेवण बनवत असतो. मग त्यासाठी पाचवी व्हॅन असते. ती त्यांची किचन व्हॅन असते. सहाव्या व्हॅनमध्ये त्यांचे कर्मचारी म्हणजे सर्व स्टाफ बसलेला असतो”. संजय म्हणाले की स्टार कपलबाबत तर परिस्थिती आणखी वाईट आहे. कारण ते कपल असूनही त्यांना वेगळ्या व्हॅन हव्या असतात. ते म्हणाले अशापद्धतीने, “सेटवर 11 व्हॅन असतात. कपल सेलिब्रिटी घरी एकत्र जेवतात, ते पती-पत्नी असतात, पण तरीही त्यांना वेगळ्या किचन व्हॅन हव्या असतात. मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही. पण खरंच ही वस्तुस्थिती आहे.” असं म्हणत संजय यांनी बॉलिवूडच्या धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे.
अमिताभ बच्चन अजय देवगण, हृतिक रोशन यांसारख्या सेलिब्रिटींते कौतुकही केले
पण सोबतच त्यांनी काही सेलिब्रिटींचे कौतुकही केले आहे. ते म्हणजे अमिताभ बच्चन अजय देवगण, हृतिक रोशन तसेच इतर काही स्टर्स असतात ज्यांच्याकडे जास्त स्टाफ नाही. आणि ते सेलिब्रिटी स्वत:च्या स्टाफचा खर्च स्वत: करतात. संजय म्हणाले की, “अमिताभ बच्चन हे एकमेव चित्रपट स्टार आहेत जे आजही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च स्वतः उचलतात आणि चित्रपट निर्मात्यांकडून त्याचे बिलही घेत नाहीत.ते म्हणतात हा माझा कर्मचारी आहे. त्याचा खर्च देणे निर्मात्याचे काम नाही”.
बॉलिवूडमधील अनुभव सांगितला
अशापद्धतीने संजय गुप्ता यांनी सध्याची बॉलिवूडची आणि बॉलिवूडमधील आताच्या कलाकारांची खरी परिस्थिती सांगितली. संजय गेल्या 40 वर्षांपासून या बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा जो काही अनुभव होता तो त्यांनी एका पॉडकास्टदरम्यान सांगितला.