
प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर…
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. यानिमित्त जगभरातून त्यांना शुभेच्छा येत आहेत.
मात्र या दरम्यान कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना माध्यमांशी संवाद साधताना मोदी यांचा वाढदिवस हा आपल्यासाठा काळादिवस आहे. असं म्हटलं आहे. त्यामुळे प्रणिती यांना भाजप नेते आणि मित्र पक्षांनी फैलावर घेतलं.
काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस आहे. पण हा आपल्यासाठा काळादिवस आहे. कारण सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. मतांची चोरी केली जात आहे. माध्यमांचे अधिकार हिरावून घेतले गेले आहेत.असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्यावर आणि भाजपवर टीका केली. यावेळी मात्र त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.
भाजप अन् मित्र पक्षांनी प्रणितींना घेरलं…
दरम्यान प्रणिती शिंदे यांनी मोदींच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्याऐवजी त्यांच्यावर आणि भाजपवर टीका केली. एवढचं नाही तर यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट मोदींचा वाढदिवस म्हणजे काला दिवस असल्याचं म्हटल्याने त्यांच्यावर भाजप नेते आणि मित्र पक्षांनी टीकेचा भडिमार केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी घोटाळेबाजांच्या सरकारला उलथवण्याचं काम केलं. 2014 च्या पूर्वी सगळे काळे दिवस होते. त्यानंतर ही 11 वर्ष म्हणज परिवर्तनाचे दिवस आहेत. त्यांनी विकसित भारताचा नारा दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या लोकांच्या पोटात दुखत आहे.
दुसरीकडे भाजचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, मला महिलेचा अपमान करायचा नाही. फम कॉंग्रेसमध्ये स्वत: चं वर्चस्व निर्माण करण्यासाठी पंतप्रधानांवर त्या कुवत नसताना , उंची नसताना बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे. सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या मुलीला समज द्यावी. तर राम कदम म्हणाले की, हा काळा दिवस नाही. ही कॉंग्रेसला डोळ्याचा आजार झाल्याची लक्षण आहेत. काळा दिवस आठवायचा असेल तर आणीबाणी आठवा. असं म्हणत प्रणिती शिंदेंना भाजप नेते आणि मित्र पक्षांनी फैलावर घेतलं.