
संजय राऊत म्हणाले; बात बहोत दूर तक…
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
यातच राज ठाकरे यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीत आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.
या बरोबरच देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांना मोठा इशारा दिला आहे.’शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने मी शोधलेत, आता त्या कारखान्यांना मी दाखवतो’, अशा शब्दांत फडणवीस यांनी इशारा दिला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह हे रविवारी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दरम्यान,राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.