
कोणत्या पक्षाला किती जागा; CM कोण होणार?
बिहार विधानसभा निवडणुका २०२५ च्या तारखा जाहीर होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होणार असून, १४ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.
बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार?” या प्रश्नाचे उत्तर शोधणारा, MATRIZE-IANS चा पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे, ज्याने राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू केली आहे.
सर्वेक्षणानुसार, यंदाचा मुकाबला चुरशीचा असला तरी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मजबूत आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, तेजस्वी यादव आणि निवडणुकीच्या मैदानात नव्याने उतरलेले प्रशांत किशोर (PK) देखील मतदारांमध्ये आपली जागा बनवण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.
बिहारमध्ये कोणाला बहुमत? (२४३ जागा)
एनडीए (जेडीयु + भाजप) मिळून १५० ते १६० जागा मिळणार आहेत, या पक्षांसाठी हे यश ४९ टक्के टक्के असेल.
महाआघाडी (आरजेडी + काँग्रेस) मिळून ७० ते ८५ जागा मिळतील हे यश ३६ टक्के इतके असेल असा सर्व्हेचा अंदाज आहे.
इतर पक्षांना मिळून ९ ते १२ जागा मिळतील म्हणजेच या निवडणुकीत एनडीए, महाआघाडी वगळता अपक्षांपासून इतर पक्षांना १५ टक्के जागा मिळतील.
NDA ला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून, महागठबंधनसाठी हा मोठा चिंतेचा विषय ठरू शकतो.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण पुढे?
MATRIZE-IANS च्याओपिनियन पोलचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा. आजही लोकांची पहिली पसंती नितीश कुमार हेच आहेत. मात्र, इतर चेहऱ्यांनीही आपली पकड मजबूत केली आहे.
मुख्यमंत्री पदासाठी कोणत्या नेत्याला किती पसंती?
सर्व्हेमध्ये नितीश कुमार यांना ४२ टक्के पसंती दिसून आली.
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून १५ टक्के पसंती दिसून आली.
प्रशांत किशोर यांना ९ टक्के तर चिराग पासवान यांना ८ आणि सम्राट चौधरी यांना ३ टक्के पसंती आहे
इतर या वर्गवारीत २३ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.
या आकडेवारीनुसार, नितीश कुमार आजही मोठ्या फरकाने सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री चेहरा आहेत. विशेष म्हणजे, थेट निवडणुकीच्या राजकारणात उतरलेले प्रशांत किशोर एक मजबूत तिसरा पर्याय म्हणून उदयास आले आहेत.
सर्व्हेनुसार, नितीश कुमार यांच्या कारभाराबद्दल बिहारच्या जनतेची प्रतिक्रिया मिश्रित स्वरूपाची आहे, जी NDA साठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि एकूण ७३ टक्के लोक समाधानी असले तरी, २४३ जागांच्या विधानसभेत २३ टक्के लोकांची नाराजी NDA ची डोकेदुखी वाढवू शकतो.
नितीश सरकारच्या कामावर जनतेचे मत
खूप समाधानी : ४२ टक्के
समाधानी : ३१ टक्के
नाराज : २३ टक्के
काही सांगता येत नाही: ४ टक्के