
सगळे उठतात आणि…
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. जरांगे यांनी मुंबईतील उपोषणानंतर मोठे यश मिळवत मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले. सरकारने जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर थेट जीआर काढत प्रमुख सहा मागण्या मान्य केल्या.
आता नुकताच बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांनी सावध होणे गरजेचे आहे. आपल्याला आता जीआरसाठी लढावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाज हा शेती करणारा आहे. आपल्याला नोकरी आधार पाहिजे. यांना वाटते की, आपल्याला नोकरी आणि शिक्षण मिळू नये, ही भूमिका यांची आहे आणि माझी भूमिका आहे की, यांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे.
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी म्हटले की, त्याचे कारण म्हणजे अचानक अशी संकटे शेतीवर येतात आणि शेती उद्धवस्थ होते. बाकीच्यांना शेती पण आहे आणि नोकरी पण आहे, त्यामुळे त्यांना डबल आधार आहे. आपल्या शेतकऱ्यांना आधार नाहीये, हे शेतकऱ्यांनी समजून घ्या. त्यामुळे आपण ताकदीने मराठा आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही पण राहिलेल्या मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीने उभे राहायचे.
शेतीला जोड नोकरी आणि शिक्षण आहे. यांनी कितीही डाव टाकली तरीही यांना हरवायचे. 2029 ला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात गेलेले नेते. 100 टक्के आठवणीने काळजीपूर्वक बारिक लक्ष देऊन त्यांना पाडायचे. आत्महत्येच्या विषयावर बोलताना जरांगे यांनी म्हटले की, पोलिसांचा तपास हा दबावापोटी असू शकतो, अशी आम्हाला शंका आहे. लोकांच्या जीवाशी खेळू नका.
मराठ्यांचा जेवढा अपमान करता येईल, तेवढा प्रयत्न भुजबळ करत आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात. सगळीकडून उठतात आणि बीडमध्ये मोर्चा काढतात. सगळे नेते त्यांचे असणार, सर्व पदाधिकारी त्यांचे असणार. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असेही मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना इशारा देत म्हटले आहे.