
गौतमी पाटीलचा धक्क्कादायक दावा !
पुण्यातील रिक्षा अपघात प्रकरणामुळे लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आली आहे. ३० सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ तिच्या नावावर असलेल्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली होती.
या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झाले असून रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, रिक्षाचालक कुटुंबीयांनी गौतमीने याप्रकरणी आमची कोणतीच मदत केली नसल्याचा आरोप केला आहे.
याप्रकरणावर आता अखेर गौतमीने मौन सोडलं असून, रिक्षाचालक कुटुंबीयांना अपघातााच्या दिवशी दुपारीच मदत पुरवली असल्याचा दावा केला आहे. मात्र, कुटुंबीयांनी मदत नाकारत १९ लाख रूपयाची मागणी केली असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत गौतमीने ही माहिती दिली आहे.
गौतमी पाटीलने सांगितले की, ‘या प्रकरणात माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं जात आहे. माझा या घटनेची काही संबध नाही पोलिसांनीही हेच सांगितले आहे. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली आहे. अपघातग्रस्त कुटुंबांच्या नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करण्यात येत आहे. कुणी 19 लाख तर कुणी 20 लाख रुपये मागितले जात होते असे माझे मानलेले भाऊ मला सांगत आहेत. आता याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याने सगळं कायद्यानेच होणार असल्याचं गौतमीने यावेळी सांगितलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या महिन्यात (30 सप्टेंबर) वडगाव पुलाजवळ गौतमी पाटीलच्या वाहनाने एका रिक्षाला मागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात मरगळे नावाचे रिक्षाचालक गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी गौतमी ही कारमध्ये उपस्थित नव्हती. मात्र, अपघाताततील कार तिच्या नावाने असल्याने नृत्यांगणा चर्चेत आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिली आहे.