
‘या’ ५ जिल्ह्यांसाठी ₹४८० कोटींचा निधी मंजूर !
अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या पीक नुकसानीमुळे चिंतेत असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नुकताच एक आदेश ( Govt GR) जारी केला असून, त्यानुसार काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी ₹४८० कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी दिली आहे.
यामुळे दिवाळीपूर्वीच या शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होण्याची शक्यता वाढली आहे.
या ५ जिल्ह्यांसाठी निधी मंजूर:
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने सध्या अमरावती आणि संभाजीनगर विभागातील खालील ५ जिल्ह्यांसाठी ४८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे:
1. अकोला (अमरावती विभाग)
2. बुलढाणा (अमरावती विभाग)
3. वाशिम (अमरावती विभाग)
4. जालना (संभाजीनगर विभाग)
5. हिंगोली (संभाजीनगर विभाग)
या ५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत मिळण्यास सुरुवात होणार आहे.
अन्य जिल्ह्यांसाठी लवकरच निर्णय:
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने यापूर्वी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एकूण ₹३१ हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती. सध्या केवळ काही जिल्ह्यांसाठी ४८० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, उर्वरित नुकसानग्रस्त जिल्ह्यांसाठी मदतीसंदर्भात लवकरच स्वतंत्र शासन निर्णय (GR) जारी केला जाणार आहे. निधी मंजूर झाल्यामुळे आता पुढील वाटप प्रक्रिया वेगाने पार पाडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.