 
                महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फलटण येथे झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच प्रकरण गाजत आहे. यात काही पोलिसांवरच गंभीर आरोप झाले आहेत. आज संजय राऊत यांना या विषयावर विचारल्यानंतर ते बोलले.
फडणवीस खोट बोलतात. त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं आहे. फडणवीसांनी संवेदनशील असलं पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्याने इतकं खोटं बोलू नये. विरोधकांवर लाथा घालून, शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत” असं संजय राऊत म्हणाले. “ज्या अर्थी जनतेचा रोष आहे. काही काळ हा विषय तुम्हाला गांभीर्याने पाहता आला असता. पण तुम्हाला राजकारण महत्वाच होतं. कालचा कार्यक्रम महत्वाचा होता. त्याच्यामुळे तुम्ही तिथे गेलात. एका महिला डॉक्टरची आत्महत्या हा विषय तुम्ही गांर्भीयाने घेत नसाल, मूळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
त्या मुलीने आत्महत्या केली. तिला करायला भाग पाडली याचा अर्थ कायद्याची, गृहखात्याची भिती राहिलेली नाही. महाराष्ट्रात हे वारंवार होतय. मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीची ज्या पद्धतीने हत्या केली, हा विषय गंभीर आहे. तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे. इतर लोकांवर पाळत ठेवायला वेळ आहे. इतर लोकांच्या मागे इंटलेजिन्स लावायला वेळ आहे. भाजपच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे. पण महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेत असणारी अव्यवस्था सावरायला वेळ नाही” अशी टीका संजय राऊतयांनी केली.
‘1 नोव्हेंबरचा मोर्चा अभूतपूर्व असेल’
दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आज उपशाखाप्रमुखांचा मेळावा आहे. आमची जमिनीवरची फौज आहे, त्यांना काय संदेश देतोय, याकडे सगळ्यांच लक्ष आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करतील. मुंबईतून मोठ्या प्रमाणातून मुंबईतल्या उपशाखाप्रमुखांचा मेळावा आहे. 1 नोव्हेंबरला मतदारच्या यादीतल्या घोळा संदर्भात सर्वपक्षीय मोर्चा निघतोय. दिल्लीला धडकी भरेल, निवडणूक आयोगाला घाम फुटेल अशा पद्धतीचा मोर्चा काढावा, यासाठी तयारी सुरु आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, डावे पक्ष प्रत्येकजण मोर्चाच्या यशासाठी झटतोय. 1 नोव्हेंबरचा मोर्चा अभूतपूर्व असेल” असा दावा संजय राऊत यांनी केला.



 दै चालु वार्ता
                                        दै चालु वार्ता                     
                 
                 
                