पुण्यातील जैन हॉस्टेल प्रकरणी ट्विस्ट आणला का घडवला ?
पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बाबत काल गोखले बिल्डर यांनी संबंधित ट्रस्टींना आपण व्यवहार रद्द करत आहोत माझे पैसे परत द्या असा मेल केला आहे. एका बाजूला आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत असलेल्या रवींद्र धंगेकर यांना दोन दिवस काही न बोलण्याचे आदेश दिले असल्याचे स्वतः रवींद्र धंगेकर यांनी सांगितला आहे. एकाच दिवशी या दोन गोष्टी घडणं हा योगायोग म्हणायचा का राजकारणाचा नवा डाव आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मॉडेल कॉलनी भागात असलेल्या एच एन डी बोर्डिंग संस्थेची जागा एका खासगी बिल्डरला दिल्याने वाद सुरू झाला. यामध्ये महायुती मधील शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सडेतोड आरोप करत त्यांचा आणि संबंधित बिल्डर विशाल गोखले यांचे आर्थिक संबंध असल्याचे समोर आणलं. यानंतर ही घटना फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात पोहचली.
गेल्या १० दिवसांपासून, एका बाजूला रवींद्र धंगेकर हे त्यांच्या ट्विट च्या मालिकेतून मोहोळ यांना उत्तर मागत होते आणि तिकडे मोहोळ रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त आहेत असं सांगत रोज आरोप प्रत्यारोप सुरूच होते. अखेर उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर धर्मदाय आयुक्त यांनी या व्यवहारावर स्टेटस को आणला म्हणेजच पुढील आदेशापर्यंत कुठला ही व्यवहार आणि बांधकाम न करण्याचे आदेश दिले. दरम्यान, विविध पुरावे दाखवत रवींद्र धंगेकर यांच्याकडून मोहोळ यांच्याविरोधात मालिका संपवायला मागे हटत नव्हते. असं असताना भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी युती मध्ये पडलेला मिठाचा खडा बाजूला करण्यासाठी थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली.
रविवारी एकनाथ शिंदे हे आळंदी दौऱ्यावर आले होते. यावेळी रवींद्र धंगेकर यांनी त्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलताना, त्यांना समज दिली आहे आणि योग्य तो निरोप दिला आहे असल्याचं थेटपणे जाहीर केलं. रविवारी संध्याकाळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी जैन बोर्डिंग बाबत मागे हटणार नाही अशी भूमिका जाहीर केली मात्र रात्री ११.३० वाजता पत्रकार परिषद घेत त्यांना मुरलीधर मोहोळ यांनी व्हॉट्सॲप वर विशाल गोखले यांनी ट्रस्टी यांना मेल करून हा व्यवहार रद्द झाल्याचे जाहीर केलं.
मोहोळ यांनी या व्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच विशाल गोखले हा बिल्डर माझा मित्र होता, आहे आणि राहणारच अशी भूमिका घेतली होती. आता प्रश्न असा आहे की जर त्यांचा या प्रकरणी काही संबंध नव्हता तर मग बिल्डर ने संस्थेला केलेला मेल हा मोहोळ यांनी राजू शेट्टी यांना तो मेल का पाठवला? सकाळी ११ वाजता बिल्डर गोखले ने पाठवलेला मेल मोहोळ यांनी रात्री १०.४५ वाजता शेट्टी यांना का पाठवला? बिल्डर यांनी केलेला मेल थेट राजू शेट्टी यांना का नाही पाठवला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
मध्यरात्री १.२० वाजता केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबईत दाखल झाले. एकीकडे अमित शहा यांचा मुंबई दौरा आणि त्याच दिवशी हा व्यवहार अर्था रद्द होणं, आणि एकनाथ शिंदे यांचं रवींद्र धंगेकर यांना निरोप देणे हा निव्वळ योगायोग आहे का नवीन राजकीय डावा ची सुरुवात? हे पाहणं महत्त्वाचं असेल…


