कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं…
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभल केला आणि विजयाची चव चाखली.
या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. कर्णधार लॉरा वॉल्वार्डने या प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजी निमंत्रण दिलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या. तसेच विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना कर्णधार लॉरा वॉल्वार्डने कडवी झुंज दिली. एक वेळ अशी आली होती की हा सामना हातून निघून जातो की असं वाटत होतं. कारण एका बाजून लॉरा खंबीरपणे भारतीय गोलंदाजांचा सामना करत होती. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी भारताला खूपच झुंजावं लागलं. पण या विकेटसाठी हरमनप्रीत कौरने टाकलेले फासे योग्य पडले आणि टीम इंडिया सामन्यात आली.
कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितलं की, ‘जेव्हा लॉरा आणि सुने फलंदाजी करत होत्या. तेव्हा सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मी फक्त शफाली तिथे उभी असल्याचे पाहिले. तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा विचार केला आणि मला वाटलं की आज तिचा दिवस आहे. मला वाटले की मला माझ्या अंतर्मनाचं ऐकावं लागेल. जर माझे मन म्हणत असेल तर मला तिला किमान एक षटक द्यावे लागेल. हा निर्णय आमच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. जेव्हा ती संघात आली, तेव्हा आम्ही तिला बोललो की आम्हाला 2-3 षटके लागतील. ती म्हणाली की जर तुम्ही मला गोलंदाजी दिली तर मी दहा षटके टाकेन. तिचे श्रेय तिला जाते, ती खूप सकारात्मक होती आणि ती संघासाठी तिथे होती.’
शफाली वर्माने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी आणि विजयाची शिल्पकार ठरली. तिने फलंदाजीत 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 87 धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही योगदान दिलं. शफाली वर्माने 7 षटकं टाकली आणि 36 धावा देत दोन गडी बाद केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताला विजयाची चव चाखता आली. शफाली वर्मा म्हणाली की, ‘मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी येथे पाठवले आहे आणि ते आज दिसून आले. आम्ही जिंकलो याचा खूप आनंद आहे आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते कठीण होते पण मला स्वतःवर विश्वास होता.


