उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली; थेट म्हणाले…
उद्धव ठाकरे सध्या मराठावाडा दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. कर्जमाफीच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. उद्धव ठाकरे गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत
पूर्ण कर्ज माफी झालीच पाहिजे, असे त्यांनी म्हटले. नुकताच उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संविधानात उपमुख्यमंत्रिपदच नाहीये. सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाहीये. ज्यावेळी मी कर्जमाफी केली त्यावेळी मी परदेशी समिती तुमच्याकडे पाठवली का? मुख्यमंत्री म्हणत आहेत की, आता जर कर्जमुक्ती केली तर बॅंकांचा फायदा होईल. मग मुख्यमंत्र्यांनी सांगावे की, जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा कसा फायदा होणार नाही.
पुढे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी प्रामाणिकपणे अभ्यास न करता, मला ढ म्हणा तरीही अभ्यास न करता दोन लाखाची कर्जमाफी केली. मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत बसता बसता पडले पडता पडता बसले त्यांनी पंचाग काढून बसले आहेत, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बिहारमधील निवडणुकीसाठी प्रचाराला गेले होते.
यादरम्यान स्टेजवरील खुर्चीवर ते बसले आणि पडता पडता वाचले. आता याचीच खिल्ली उडवताना उद्धव ठाकरे हे दिसले आहेत. देवेंद्र फडणवीस पडतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. उद्धव ठाकरे म्हणाली की, मी राजकारण करायला आलोय का तर नाही… हे संकट थांबणार की नाही याचा थागपत्ता लागत नाही. हे संकट कमी पडतंय की काय?
पाऊस एवढा येतोय की पुराचे लोंढे येत आहेत… पूर्ण सडून गेल आहे… त्यातून कोणाच्या हाती लागलं असेल तर त्याला हमीभाव मिळतोय का? मागे एक चळवळ चालू होती पण त्यांना कोपराला गूळ लावला. जुनमध्ये कर्जमाफी करायची म्हणतायत कारण त्यांना आता निवडणूक काढायची आहे. त्याच्यात धमक नाही कि जिल्हापरिषद घ्यायला निवडणुकी आदी कर्जमाफी झाल्याशिवाय त्यांना मत नाही असं सांगा, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.


